Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७२

त्याप्रमाणें तालुके व देहें लिहिले गेले नाहींत. परंतु त्यांची वहिवाट आजपर्यंत आपल्याकडे चालत आली असतां, तहनाम्याखेरीज साडेएकूणनव्वद देहें सोडून देण्याविषयीं कंपनी इंग्रजबहादूर यांचे ह्मणणें पडलें. सबब * * * * * साडेएकूणनव्वद देहें खालसा व दुमाला मिळून आहेत ते सोडून कंपनी इंग्रजबहादूर यांजकडे द्यावयाचें ठरलें. त्याजवरून ही सनद तुह्मांस सादर केली असे. तरी सदर्हू साडेएकूणनव्वद देहें कंपनी इंग्रजबहादूर यांजला लिहून, अंमलदार यांचे स्वाधीन, सरदेशमुख्या व पाटीलक्या व मोकदम्या व नावघाट वगैरे वतनबाब खेरीजकरून देणें. साहेबबहादूर यांजकडील अंमलदार सदर्हू गांवीं अंमल करतील. तुह्मीं दखलगिरी न करणें. जाणीजे. छ. २४ रबिलाखर हे विनंति. (मोर्तबसुद)"[]
 ह्याप्रमाणे दक्षिणेंतील गांवें इंग्रजांच्या ताब्यात देऊन एका प्रश्नाचा निकाल लागला. परंतु दुसरा ब्रिटिश सरकारच्या कांटिंजंट फौजेच्या खर्चाचा प्रश्न तसाच राहिला. महाराज दौलतराव शिंदे मृत्यु पावल्यामुळें त्यांना ब्रिटिश सरकाराकडून जें चार लक्ष रुपये पेनशन मिळत असे, तें बंद झालें. तें त्यांनी कांटिंजंट फौजेच्या खर्चाकरितां लावून दिलें होतें. अर्थात् तें कमी झाल्यामुळें बायजाबाईसाहेबांच्या दोन लक्ष पेनशनानें व रजपूत संस्थानाकडील खंडणीनें ती रक्कम भरून येईना.

बायजाबाईसाहेबांचे पेनशन, ... ... ...

२,००,०००

खंडणी संस्थान कोटा,... ... ... ...

१,०२,४३०

 " " कोट्री ... ... ...

१०,६१०

 " " जयपूर ... ... ...

१,००,०००

 " " रतलाम व सेलना ... ... ...

१,१२,१४०


  1.  १ ही अस्सल पत्राची नक्कल असून, ती आमचे मित्र कै. रा. रा. वामनराव लेले वकील राहणार पुणे ह्यांच्या दप्तरांतून आह्मांस उपलब्ध झाली आहे.