पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५

जांच्या चेहऱ्यामध्यें फार फरक झालेला पाहून मला एकदम वाईट वाटलें. त्यांचे हात व शरीराचा वरील भाग अगदीं कृश झाला होता. पोट व पाय फार सुजले होते. मी त्यांच्याजवळ गेलों व त्यांचा हात मी आपले हातांत घेतला. आणि ते काय शब्द उच्चारतात ते ऐकण्याकरितां मी त्यांच्या तोंडाजवळ आपले डोकें नेलें. त्यांच्यानें प्रथमतः कांहीं बोलवेना; ह्मणून ते स्तब्ध राहिले होते. शेवटीं, कांहीं वेळानें त्यांनी स्पष्ट व मोठ्यानें, तेथील सर्व लोकांस व पडद्यांमध्यें देखील ऐकूं जाईल अशा रीतीनें, "जो तुम मुनासीब, सो करो" ( तुह्मांस जें योग्य वाटेल तें तुह्मी करा ) हे शब्द उच्चारिले. ते ऐकून मीं महाराजांस उत्तर दिलें कीं, "महाराजांच्या इच्छेप्रमाणें प्रत्येक गोष्ट केली जाईल." नंतर मीं त्यांचे थोडें सांत्वन केलें; व परमेश्वराच्या कृपेनें अद्यापही महाराजांच्या प्रकृतीस आराम पडेल, अशी आशा दर्शविली. ह्या वेळीं महाराजांस फार गहिंवर आला, व त्यांनीं "आपके देखनेसे, और आपके मोहबतसे–" एवढे हृदयद्रावक शब्द उच्चारिले. परंतु पुढें त्यांच्यानें तें वाक्य पुरें करवलें नाहीं. पुढें पुष्कळ वेळ ते स्तब्ध राहिले. शेवटीं मीं "महाराज साहेबांस आणखी कांहीं मला कळविण्याची इच्छा आहे की काय?" असें विचारलें. त्या वेळी त्यांनी पुनः "बहुत तेरासा कहना है" (आपल्याला पुष्कळ सांगावयाचें आहे ) असे शब्द उच्चारिले. परंतु पुढें पुष्कळ वेळ त्यांच्याने कांहीं बोलवेना. तेव्हां मीं असा विचार केला कीं, दुसऱ्या खोलीमध्यें आपण कांहीं वेळ जावें, व महाराजांस थोडीशी हुषारी वाटली व बोलण्याची थोडी शक्ति आली ह्मणजे पुनः त्यांच्या जवळ यावें. तें तेथील मंडळीस पसंत पडलें. मी उठलों न उठलों तोंच, बायजाबाईंनीं पडद्यांतून "डा. प्यांटन ह्यांस बोलावून आणवावें" अशी सूचना केली. तेव्हां मी, महाराजसाहेबांची तशी इच्छा आहे