गोप्रदानें केलीं. "ह्या दानधर्माची कीर्ति त्या प्रांतीं बहुत १[१]झाली. ह्याप्रमाणें बायजाबाईंनीं व हिंदुरावांनीं महाराजांच्या जेवढ्या इच्छा होत्या तेवढ्या सर्व उत्तमप्रकारें सिद्धीस नेल्या. पुढें महाराज अधिक अधिक थकत चालले, व त्यांना उदराची व्यथा होऊन त्यांचे हातपाय सुजले. त्यामुळें त्यांचा अंतकाळ अगदीं समीप आला. बायजाबाई व त्यांचे बंधु महाराजांच्या बिछान्यासन्निध एकसारखे बसले होते. व राजवाड्यांतील सर्व सेवकजन महाराजांच्या प्रकृतीबद्दल चिंतातुर होऊन खिन्नवदन झाले होते. अखेर माघ वद्य ७ शके १७४८ रोजीं महाराजांच्या प्रकृतींत चलबिचल फार दिसूं लागली. त्या वेळीं महाराजांनी मेजर स्टुअर्ट ह्यांस बोलावून आणण्याबद्दल हिंदुरावांस आज्ञा केली. त्याप्रमाणें हिंदुरावांनीं ताबडतोब घोडेस्वार पाठवून रेसिडेंट साहेबांस पाचारण केलें. रेसिडेंट साहेब आल्यानंतर, कांहीं वेळ त्यांची भेट व शेवटचें संभाषण झाले. नंतर रेसिडेंट साहेब कांहीं वेळ महाराजांस विश्रांति देण्याकरितां दुसरीकडे जाऊन बसले. महाराजांच्या प्रियपत्नी बायजाबाई लगेच महाराजांजवळ आल्या. तों महाराजांनी त्यांच्याकडे करुणमुद्रेनें पाहून, त्यांचा व त्यांच्या बरोबर आपल्या अखिल प्रजाजनांचा शेवटला निरोप घेतला. महाराजांस देवाज्ञा होतांच राजवाड्यांत जो आकांत झाला, तो वर्णन करणे कठीण आहे. त्याचें
- ↑ ह्या दानधर्माचा वृत्तांत 'शमसूल अखबार' ह्या पत्रांत प्रसिद्ध झाला होता. तो वाचून 'एशियाटिक जर्नल' मधल्या एका लेखकाने पुढे लिहिल्याप्रमाणे उद्गार काढिले आहेत:-
"Here is a Chief, once powerful enough to inspire the British Government with apprehension, risking his throne and his life, by wasting upon idle Brahmans money which is due to his dependents!"-Page 373.
ह्या लेखकास हिंदुचालीरीतीचें ज्ञान नसले पाहिजे असेंच ह्मणावें लागतें !!