Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६

आणविलें कीं, कै. सवाई माधवराव ह्यांच्या पत्नी यशोदाबाई ह्यांचे मांडीवर दत्तक पुत्र देऊन त्यास पेशवाईचा अधिकार द्यावा. त्याप्रमाणे त्यांनी चिमाजीआप्पास यशोदाबाईंचे मांडीवर दत्तक देऊन त्यास गादीवर बसविलें. इकडे बाजीराव ह्यांनीं, दौलतराव शिंदे हे सामर्थ्यवान् व प्रबल असल्यामुळें, त्यांस चार लक्ष रुपयांचा प्रांत व सैन्याचा खर्च देण्याचें मान्य करून, त्यांचे मार्फत स्वतःस गादी मिळविण्याचा प्रयत्न चालविला. ही बातमी नाना फडनविसांस समजतांच, त्यांनीं, शिंद्यांच्या लष्करी सामर्थ्यामुळें बाजीरावांस गादी मिळेल व आपलें वर्चस्व कमी होईल, अशी भीति बाळगून, बाजीरावाकडे सूत्र लाविलें; व आपण होऊन त्यास प्रतिबंधांतून मुक्त करून गादीवर बसविण्याचा निश्चय केला. इकडे शिंद्यांचे दिवाण बाळोबा तात्या ह्यांस हा नानांचा आपमतलबाचा विचार न आवडून त्यांनी त्यांचा निषेध केला; व तो सिद्धीस जाऊं न देण्याचा प्रयत्न चालविला. बाजीराव ह्यांचा स्वभाव निश्चल व एकमार्गी नसल्यामुळें त्यांनीं, ज्यांच्या हातून आपलें कार्य सिद्धीस जाईल असें वाटे, त्यांचें आर्जव करण्याचा व त्यांस अनुकूल करून घेण्याचा क्रम आरंभिला. नाना फडनविसांनी आपली सरशी ज्या बाजूनें होईल तो मार्ग स्वीकारला. त्यामुळें उभयतांस स्वतःच्या कार्यसिद्धीकरितां दौलतराव शिंद्यांच्या मदतीची अपेक्षा करणें भाग पडलें. त्याप्रमाणें उभयतांनीं दौलतराव शिंद्यांस अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ह्या कामीं त्यांस साहाय्य कारण्यास जी व्यक्ति पुढें आली, ती सर्जेराव घाटगे ही होय. नाना व बाजीराव ह्यांनीं सर्जेरावाचा उपयोग करून आपले इष्ट कार्य तडीस नेलें.
 नाना फडनविसांनीं सर्जेराव घाटगे ह्यांचे मार्फत दौलतराव शिंदे ह्यांचे प्रियकर मुत्सद्दी रायाजी पाटील ह्यांजकडे गुप्तरीतीनें अशी रदबदली