Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भाग २ रा.
__________

बायजाबाई शिंदे ह्यांचा कुलवृत्तांत.

 बायजाबाई शिंदे ह्यांच्या वडिलांचे नांव सखारामराव घाटगे सर्जेराव हें होतें. महाराष्ट्राच्या इतिहासांत ह्या पुरुषाचे नांव फार प्रसिद्ध आहे. सखारामराव घाटगे हे कोल्हापूर प्रांतांतील कागल गांवचे देशमुख होत. कागलची देशमुखी फार जुनी असून, ती प्रथम, विजापुरचा पहिला बादशाह युसफ आदिलशाह ह्याचे कारकीर्दींत घाटग्यांच्या घराण्यास बक्षीस मिळाली; व औरंगजेब बादशाहाने विजापूर प्रांत काबीज केल्यानंतर, पुनः ती घाटग्यांस वंशपरंपरेनें इनाम करून दिली, अशी माहिती मिळते. घाटग्यांचे घराणें फार प्राचीन असून, त्यांचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा ब्राह्मणी राज्यामध्ये उदय पावला. त्याच्या वंशजांची एक शाखा मलवडीस राहिली. ती 'झुंजारराव' घाटगे ह्या किताबाने प्रसिद्ध आहे. दुसरी कागल येथे राहिली. ती कागलकर 'सर्जेराव' घाटगे ह्या नांवाने प्रसिद्ध आहे. कागलकरांस ‘सर्जेराव' हा किताब विजापुरच्या बादशाहाकडून मिळाला, अशी माहिती उपलब्ध []आहे. मि. ग्राहाम ह्यांनीं, घाटग्यांचे मूळपुरुष व कागलचे


  1.  "Representative men of the Bombay Presidency" ह्या पुस्तकामध्यें कागलचे वरिष्ठ शाखेचे जहागीरदार श्रीमंत पिराजीराव बापूसाहेब ह्यांच्या घराण्याचा अल्पसा सचित्र वृत्तांत दिला आहे. त्यांत "सर्जेराव" हे पद विजापुरच्या बादशाहाकडून मिळाले असा स्पष्ट उल्लेख आहेः-
     "The title of Sarjerao was conferred by an Emperor of Bija