Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११

रणा उत्तम प्रकारची केली होती. त्यामुळें त्यांचे सैन्य व तोफखाना पाश्चिमात्य पद्धतीवर ताण करण्यासारखा होऊन, त्यांच्याशी टक्कर देणें परराष्ट्रीयांस देखील अशक्य झाले होतें. मग एतद्देशीय प्रतिपक्षी संस्थानिकांस त्यांच्यावर नक्ष करणें दुष्कर व्हावें ह्यांत नवल नाहीं. त्यांनी लढवय्ये रजपूत पादाक्रांत केले; प्रमत्त रोहिले नेस्तनाबूत केले; दिल्लीचा शाहआलम बादशाह आपल्या मुठींत ठेविला; हैदर व टिपू ह्यांच्यावर पगडा बसविला; इंग्रजांस आपली कर्तबगारी दाखविली; व अखेर सर्वांवर छाप बसवून, दिल्लीच्या सार्वभौम बादशाहापासून आपल्या धन्याकरितां वकिल-[] मुतालकीचीं बहुमानाचीं वस्त्रे पटकावून

  1.  महादजी शिंदे ह्यांनी दिल्लीच्या बादशाहाकडून वकिलमुतालकीचीं वस्त्रें पुण्यास आणली. त्या वेळीं जो समारंभ झाला त्याचे वर्णन आणि त्या संबंधानें तत्कालीन मुत्सद्यांचे अभिनंदनपर उद्गार वाचण्यासारखे आहेत. ते एकत्र नमूद असलेलें परशरामभाऊ पटवर्धन ह्यांचे एक पत्र उपलब्ध झालें आहे, तेंच येथे सादर करितों. हे पत्र इतिहासदृष्ट्या मनोरंजक व वाचनीय असून, ह्यावरून पाटीलबावाविषयींचें समकालीन मुत्सद्यांचें मतही व्यक्त होण्यासारखे आहे.
    "राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नाना स्वामींचे सेवेसी:-

     पोा परशराम रामचंद्र कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ताा छ जिल्काद जाणोन स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री महादजी शिंदे पाटीलबावा यांच्या भेटी जाहल्या. नंतर दुसरे दिवशीं सरकार वाड्यांत येऊन त्यांणीं, पादशाहाकडून वकिलमुतलक व अमीरल-उमराव व बक्षीगिरीचा बहुमान घेऊन आलो आहे; श्रीमंतांनी घ्यावा; याप्रमाणे विनंति केली. त्याजवरून सातारियास महाराजांस विनंति लेहून, तेथील आज्ञापत्र आणवून, सदर्हू बहुमान घ्यावयाचा निश्चय करून आषाढ शुद्ध त्रितीयेस फर्मान बाडी केली. श्रीमंतांनी वकिलमुतलक व अमीरल-उमरावची खिलत च्यारकुबचा व जिगा व सरपेंच व परीदा कलगीमय लटक, व माळा मरवारी व कलमदान व ढालतरवार व मोरचेल