पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

सार्वभौम ब्रिटिश सरकार फार स्वतंत्र रीतीनें वागवीत असून, त्यांच्या अंतर्व्यवस्थेत हात घालण्यास तें किती नाखूष असे; व त्यांच्या गादीवर त्यांस (संस्थानिकांस) योग्य वाटेल तो मनुष्य बसविण्यास त्यांची किती मुभा असे, हें चांगले शिकण्यासारखें आहे. ह्या उदार राजनीतीचें उत्तम उदाहरण ग्वाल्हेर संस्थान हेंच होय, असें म्हणण्यास व त्याबद्दल ब्रिटिश सरकारच्या पूर्वीच्या उदार राजनीतीचें अभिनंदन करण्यास हरकत नाहीं.

 बायजाबाईसाहेबांच्या चरित्रांत आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. ती ही कीं, इ.स. १८५७ च्या बंडाच्या प्रसंगीं त्यांनी ब्रिटिश सरकारचा पक्ष स्वीकारून त्यास अप्रतिम साहाय्य केलें.बायजाबाईसाहेब ह्यांस ब्रिटिश सरकारावर रुष्ट होण्यासारखे कारण असून त्यांनी उदार मनानें त्यांस मदत केली, ही फार प्रशंसनीय गोष्ट आहे. ह्या उदाहरणावरून बंडाचे वेळीं हिंदुस्थानांतील स्त्रियांनीं देखील इंग्रज सरकारास किती उत्तम मदत केली हें चांगले दिसून येतें. बायजाबाईसाहेबांप्रमाणे इतर उदाहरणे अनेक आहेत. ब्रह्मावर्त येथील पेशव्यांच्या बायकांनी युरोपियन स्त्रियांस बंडाचे वेळी चांगली मदत केली, असा उल्लेख जस्टिन म्याकर्थी ह्यांनी आपल्या ग्रंथांत केला आहे. होळकराची राणी ताईसाहेब व नागपूरची राणी बांकाबाई ह्यांनीही त्या वेळीं असेच उत्कृष्ट साहाय्य केलें. ह्यावरून आमच्या राजास्त्रियांनादेखील देशकालप्रसंग ओळखण्याचे शहाणपण असून त्यांच्या ठिकाणीं ब्रिटिश सरकाराविषयीं प्रेमादरभाव वसत


(Scindia's) country—that it did not pretend to any right to control or regulate the succession to the state of Gwalior— that its sole motive in offering advice on the subject was the interest which it took in the maintenance of the general tranquillity”—that Scindiab, as the absolute and despotic ruler of the country, must be considered to possess the undoubted right of determining the succession,”—and that it was prepared to recognize any selection that might be "made by the general voice, or by a majority of the chiefs and principal persons of the country, according to the usage, whether the letter of the written law was adhered to or not.”