पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे१४३

करून, बंडवाल्यांच्या कोणत्याही विनवणीचा किंवा भुलथापीचा त्यावर परिणाम होऊं दिला नाहीं. पूर्ववयांत त्यांना स्वतंत्र राज्यकारभार चालविण्याची महत्वाकांक्षा होती; व तत्प्रीत्यर्थ त्यांनी प्रयत्नही केला होता. परंतु ह्या वेळीं अविचारी बंडवाल्यांचें प्रभुत्व स्वीकारण्याची किंवा साम्राज्यवैभव उपभोगण्याची त्यांस इच्छा नव्हती. त्यांच्या ठिकाणीं युक्तायुक्त व कार्याकार्य जाणण्याची शक्ति चांगली असल्यामुळें त्यांनी बंडवाल्यांचा पक्ष स्वीकारिला नाहीं. एवढेंच नव्हे, तर बंडवाल्यांचीं सर्व पत्रें त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे पाठविलीं, बंडवाले लोकांनीं ग्वाल्हेर प्रांतांतील प्रजेस व संस्थानच्या कामगार लोकांस अनुकूल करून घेण्याकरितां बायजाबाईसाहेबांच्या नांवाचा बळेंच उपयोग केला; व त्यांच्याकडून आपणांस पूर्ण अभयवचन असल्याची पत्रें आली आहेत, अशी खोटी गप्पही उठविली. परंतु त्यांत तथ्यांश बिलकूल नव्हता, हें निराळे सांगवयास नकोच.


 १ ग्वाल्हेरचे पोलिटिकल एजंट मेजर म्याक्फर्सन ह्यांच्या चरित्रांत, खुद्द रावसाहेब पेशवे ह्यांनी आमेन येथील शिंद्याच्या मुलकी कामगाराजवळ बायजाबाईसाहेबांची पत्रें आल्याबद्दल व शिंदे सरकारचें आपणास उत्तेजन असल्याबद्दल खोटी वल्गना केल्याचा उल्लेख आहे:-

 "About Amaen were posted, when the rebels crossed, 400 of Scindia's foot, 150 horse, and 4 guns. Scindia's Civil Officer told the Rao Saheb, 'It is the order of the Maharajah and the Dewan that you retire.' 'And who,' replied the Rao Saheb, 'are you ? A ten-ruppee underling of a Soobah, drunk with bhang! And who are the Maharajah and Dinkar Rao ? Christians! We are the Rao and Peishwa. Scindia is our slipper-bearer. We gave him his kingdom. His army has joined us. We have letters from the Baiza Baiee, Scindia himself encourages us. Tantia Topeh has visited Gwalior and ascertained all. He having completed everything I am for the Lushkar. Would you fight with us ? All is mine'. Scindia's detachment did not attempt resistance."

-Memorials of Service in India, Page, 333.