पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सर जॉन मालकम ह्यांनी मराठ्यांच्या स्त्रिया संबंधानें जें वर्णन लिहिलें आहे, तें बायजाबाईसाहेबांच्या वेळच्या स्थितीचे अगदी हुबेहूब प्रतिबिंब असून फार वाचनीय व मनोरंजक आहे. ते लिहितातः- "ब्राह्मण व मराठे संस्थानिक व जहागीरदार ह्यांच्या स्त्रियांचे दरवारामध्यें बहुतकरून फार वजन असतें; व त्यांचा अधिकार व्यक्तिविशेषांवरच चालत नसून त्यांचा राजकारणामध्यें चांगला प्रवेश असतो. मोठ्या दर्जाच्या पुरुषांशी त्यांचे लग्न झालें, ह्मणजे त्यांस बहुतकरून स्वतंत्र तनखा व जातसरंजाम मिळत असतो, व त्यांना वाटेल तितकें स्वातंत्र्य असते. त्या आपल्या तोंडावर क्वचित् बुरखा घेतात. त्या नेहमीं जन्मोत्सवाप्रीत्यर्थ मेजवान्या देत असतात, आणि सणवारानिमित्य सदोदित उत्सव करीत असतात. शिंदे, होळकर आणि पवार ह्यांच्या घराण्यांतील स्त्रियांच्या हातीं किती सत्ता असते तें वर्णन केलेंच आहे. त्यांचे गुप्त खलवतामध्यें अतोनात वर्चस्व चालत आलेंच आहे, परंतु अलीकडे रूढीच्या प्रभावामुळें राज्यकारभारामध्यें देखील त्यांचे फार माहात्म्य वाढलें आहे. पुष्कळ वेळां तर सर्व राजकारणांचें स्वामित्वच प्रसिद्धपणें त्यांच्या हातीं असल्याचे दिसून येते. त्यांना लिहिणे, हिशेब ठेवणें वगैरेचें ज्ञान बहुतकरून प्राप्त झालेलें असतें. घोड्यावर बसण्याची कला हा त्यांच्या शिक्षणाचा एक नेहमींचा भाग असून, त्यानें त्यांच्या अंगीं स्थितिपरत्वें प्राप्त होणारें राजकीय कर्तव्य उत्तम रीतीनें बजावण्याची पात्रता उत्पन्न होते. यशवंतराव होळकराची मुलगी भीमाबाई हिची व माझी एक वेळ मुलाखत झाली होती. त्या वेळी तिनें होळकराच्या घराण्याचा व राज्याचा नाश होण्याचा प्रसंग आला असतांना, मोठ्या वक्तृत्त्वपूर्ण वाणीने राजकन्येच्या कर्तव्यांचे सुरेख वर्णन केले, आणि असे सांगितले कीं, “आमच्यासारख्या निपुत्रिक व विगतपति अबलांनी


quisite cordon could be formed, but the Bheema Bai made no attempt to fly. When, however, it was thought that her apprehension was certain, she suddenly made a dash towards the small party near the General, and owing to the speed of her mare, made her way fast then, and darted off scot-free"

-Reminiscences of an Indian Official. Page 89.