पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/133

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०९

दळ व १००० घोडेस्वार होते. आग्र्यास गेल्यानंतर बायजाबाईसाहेब .. ह्या रिकाबागंजामध्यें बिद्दीचंद्र शेट ह्यांच्या वाड्यांत राहिल्या होत्या. ग्वाल्हेरीहून आग्र्यास जाईतोंपर्यंत त्यांचे प्रवासामध्यें फार हाल झाले व ब्रिटिश सरकारच्या गैरमर्जीचीं कटु फलेंही अनुभवण्याचे त्यांस अनेक प्रसंग आले.

 बायजाबाईसाहेब ग्वाल्हेरीहून गेल्यानंतर ब्रिटिश रेसिडेंट मि क्याव्हेंडिश ह्यांनी महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस राज्यारूढ करून सर्व मुखत्यारी दिली. महाराज जनकोजीराव हे ग्वाल्हेरच्या सैन्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या सर्वस्वीं आधीन होऊन त्यांच्या तंत्राने वागूं लागले. त्यामुळे ते अधिकारी फार प्रमत्त होऊन, ग्वाल्हेरचें राज्य ह्मणजे केवळ लष्करी लोकांचें साम्राज्य झालें. महाराजांनीं नारोपंत आपटे ह्यांस दिवाणगिरीचीं वस्त्रें दिलीं, व रामराव फाळके, बळवंतसिंग मुनशी, मुल्लाजी शेट, उदाजी खडके, भाऊ पोतनीस वगैरे लोकांस दरबारांतील अधिकाराचीं कामें दिलीं. परंतु त्यांची एकंदर कारकीर्द अस्वस्थतेची व बेबंदशाहीची होऊन राज्यामध्यें एकसारखे तंटेबखेडे व दंगेधोपे चालले होते. महाराजांनी बायजाबाईंच्या वेळचे खजिन्याचे प्रमुख अधिपति मणीरामशेट ह्यांस कैद केलें व त्यांचा फार छल केला; त्याचप्रमाणें बायजाबाईंच्या लोकांचाही फार छल केला. तात्पर्य, बायजाबाईंच्या पश्चात् ग्वाल्हेर येथें बिलकूल शांतता न राहून प्रजा फार असंतुष्ट झाली. ह्या वेळीं ग्वाल्हेर दरबारांतील सर्व राजकारणांवर एकसारखी नजर ठेवण्यास मि. क्याव्हेंडिश ह्यांच्यासारखे खबरदार रेसिडेंट होते, ह्मणून रक्तपातासारखे भयंकर अनर्थ गुदरले नाहींत, हें भाग्यच समजलें पाहिजे.

 ग्वाल्हेर सोडल्यापासून बायजाबाईंच्या पाठीमागे एकसारखें दुर्दैव लागले होतें. आग्र्यास गेल्यानंतर त्यांची एकुलतीएक मुलगी चिमणा-