अशी महासाध्वी-केवळ अवतारी-स्त्री मराठी राज्यांत निर्माण झाली असून, तिचें सविस्तर व साधार चरित्र उपलब्ध नसावें ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय१[१] ! अहल्याबाईप्रमाणेंच मराठ्यांच्या इतिहासांत, जिजाबाई, येसूबाई, दीपाबाई, ताराबाई ह्या भोंसले घराण्यांतील व राधाबाई, काशीबाई व गोपिकाबाई ह्या पेशवे घराण्यांतील स्त्रिया चरित्रलेखनयोग्य आहेत. त्यांच्या तोडीच्या उमाबाई दाभाडे, मैनाबाई पवार, बायजाबाई शिंदे, आणि रखमाबाई चासकर ह्या प्रख्यात स्त्रिया होऊन गेल्या; परंतु त्यांची सुंदर व विस्तृत चरित्रे प्रसिद्ध नसल्यामुळें इतिहासग्रंथांत व जुन्या बखरींत फक्त त्यांचा नामनिर्देश मात्र दृष्टीस पडतो.
ह्यांशिवाय वाराणशीबाई पेशवे व जिऊबाई फडनवीस ह्या स्त्रियांच्या संबंधाने युरोपियन लोकांनीं क्वचित् क्वचित् उल्लेख केलेला दृष्टीस पडतो. मेजर-जनरल सर आर्थर वेलस्ली ह्या प्रसिद्ध इंग्रजी सेनापतीने नाना फडनविसांची बायको जिऊबाई हिची भेट घेऊन, ता. १८ मे इ. स. १८०४ रोजीं, पुण्याचे रेसिडेंट कर्नल क्लोज ह्यांस असे कळविलें कीं, “ही बाई फार सुस्वरूप व सौंदर्यवती असून, हिच्या संबंधाने तहामध्ये कांहीं तजवीज व्हावी अशी हिची योग्यता आहे२ [२] .” शेवटचे बाजीराव पेशवे व प्रतिनिधि ह्यांच्या स्त्रियांसंबंधानें ग्रांटडफसाहेबांनीं एके
- ↑ १ अहल्याबाईसारख्या लोकोत्तर स्त्रीचें चरित्र सांगोपांग व कागदपत्रांच्या अस्सल माहितीवरून लिहिण्याचा आमचा फार दिवसांचा हेतु होता. परंतु ही माहिती उपलब्ध नसल्यामुळे तो हेतु आजपर्यंत सिद्धीस नेता आला नाही. तथापि कळविण्यास आनंद वाटतो कीं, ह्या उदार व साध्वी स्त्रीच्या चरित्राची बरीच माहिती उपलब्ध झाली असून हे चरित्र लवकरच प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे.
- ↑ 2. "She is very fair and handsome, and well-deserving to be the object of a treaty."
her amazing energy and activity, will bear favourable comparison either with the greatest administrators of her country, or with the brightest ornaments of her sex in any land.”