Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०

बेळचें लोकमत अनुकूल असल्याचें दिसून येते, व त्यावरून ही राजस्त्री सामान्य प्रतीची नसून, राज्यकार्यकुशल व शहाणी होती असें निःसंशय सिद्ध होतें. खऱ्या इतिहासाच्या अभावीं ह्या स्त्रीच्या महत्त्वाच्या राजकारणांचा वृत्तांत किंवा बुद्धिचातुर्याच्या गोष्टी आह्मांस येथें सादर करितां येत नाहींत. तथापि, ह्या स्त्रीनें आपल्या लोकोत्तर गुणांनी आपलें नांव कीर्तिमंदिरांत प्रविष्ट केलें आहे ह्यांत शंका नाहीं. हिंदुस्थानच्या इतिहासांत रोझयाबेगम, चांदबिबी, ताराबाई, अहल्याबाई हीं स्त्रीरत्नें ज्याप्रमाणें चमकत आहेत, त्याचप्रमाणे बायजाबाई शिंदे ह्यांचेही नांव अखंड चमकत राहील.

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 104 crop)