पान:बाबुर.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। बाबुर स्वास्थ्य आल्यासारखे झाले होते. तेव्हा त्याचे लक्ष आता त्याच्या स्वतःच्या अगदी निकटच्या परिस्थितीकडे गेले , आणि कांहीं बड्या धुंडांना शिस्त लावली पाहिजे असे त्यास वाटले, अनेक साहसांत मदत करणारा व काबूलच्या स्वारीचे सेनापतित्व गाजविणारा बकी बेग बाबुरास डोईजड झाला होता, त्याची मिजास फारच वाढली होती. दरबारी त्याला फारच मोठा मान होता; पण हे सर्व वैभव लोकांच्या डोळ्यांत सलेल अशा उद्दाम पद्धतीची त्याची वागणूक होती. तो बाबुराच्या मनांतून उतरला होता. त्याचे महत्व व त्याने केलेली बहुमोल कामगिरी ह्या सर्व गोष्टी बाबुराच्या मनांत एकसारख्या वागत होत्या, पण त्याची वागणूक व कर्तबगारी यांचे त्रैराशिक व्यस्त प्रमाणांत बसले. त्याच्या राहत्या वाड्यास राजवाड्याचे स्वरूप आले होते. तेथे नगारे-नौबदी झडत होत्या आणि भालदार ललकारत होते. कांहीं कांहीं वेळेला हा राजा का तो राजा असा आभास निर्माण होत होता. एक दिवस बाबुराचा तोल गेला आणि त्याने त्याला ताड्दशी ‘तुला दिवाणपदावरून बडतर्फ केले आहे आणि तू चालता हो' असे सांगितले. त्याबरोबर बकी बेगची धुंदी खाडकन् उतरली व त्याने बाबुरास विनं केली की 'खावंद, आपण मला नऊ अपराधांची माफी करण्याचे अभिवचन दिले होते तरी त्याचा विचार व्हावा.' बकी बेग पाण्यासारखा पातळ झालेला पाहतांच दुस-या एखाद्यास कव आली असती, पण व्यवहाराच्या दिव्य दिव्यांतून तावूनसुलाखून निघालेले त्याचे मन आतां भावनांना दाद देण्यास तयार नव्हते. हे त्याचे वाक्य ऐकतांच बावुराने अकरा अपराधांची यादी त्याजपुढे टाकली. त्याबरोबर तो खजील झाला, त्याला तेथून जावे लागले. जातांना वाटेत अफगाणांच्याकडून त्याचा खून झाला. बकी बेगवर बावुराने शस्त्र धरलेले पाहताच त्याचा उपद्वयापी भाऊ जहांगीर हाही पण तेथून नाहीसा झाला आणि एकंदर वातावरण निष्कंटक झाले.