पान:बाबुर.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ बाबुर । सकाळी नवाच्या सुमारास राणा संगाचा प्रथम हल्ला बाबुराच्या सैन्यावर झाला. ही धडक बाबुराच्या उजव्या बगलेवर मोठ्या जोराने बसली. त्याबरोबर उजव्या बगलेचें राखीव सैन्य त्या ठिकाणी आले व त्याने जोराची मारगिरी करून राजपुतांचा दाब कमी केला. त्याच बगलेच्या मध्यावर असणा-या तोफखान्याने बेजरब मारा सुरू केला. हाच प्रकार डाव्या बगलेलाही सुरू झाला. आतां जोराची धमाधमी सुरू झाली. राखीव तुकड्या पुन्हा पुन्हां जाऊन पडती बाजू सावरू लागल्या. उभयपक्ष तुल्यबल होते. मागेपुढे रेटारेटी चालू होती, कित्येक तास गेले तरी लढाई आतां कह्यांत येण्याचा रंग दिसेना. या क्षणाला राणा संगाची सरशी दिसावी तर दुस-या क्षणाला बाबुराची सरशी व्हावी असे चालले होते. रणति रणमस्त होऊन उभयपक्ष हालचाली करीत होते. रक्ताच्या चिळकांड्या, घोड्यांच्या टापा आणि तरवारीच्या खणखणाटांनी वातावरण दुमदुमून चालले होते. तोफांचे धडाकेही चालू होते. आतां तुलुधमा पद्धतीने शत्रूला जेर करण्याचे ठरलें, व बाबुराचा तसा हुकूम होतांच राणा संगाचे बरेच सैन्य मागून पुढून घेरले गेले. राजपुतांच्या पाठी बेसुमार सडकू लागल्या. पिछाडी सांवरण्यास जातात तो आघाडीवर तोच प्रकार सुरू झाला, आणि दोन्ही बगलांवर जबरदस्त रेटा येतांच एवढे खंदे राजपूत वीर पण घाबरले. तरीसुद्धा त्यांनी पंचप्राणांची तमा न करता आपला व्यूह बराच वेळ तसाच तारून धरला. | बाबुराचे सैन्यही थोडे बहुत गांगारलें व राजपुतांची सरशी होणार असा आभास निर्माण झाला, पण इतक्यांत बाबुराच्या राक्षसी तोफा बेसुमार आगी ओकू लागल्या. धुराच्या अलोट लोटांनी रणमैदान व्यापलें, त्याबरोबर सैन्यांत गोंधळ उडाला, राजपुतांचा मांड विसकटला. पिछाडी सडकणाच्या बाबुराच्या सैन्याची फळी फोडून जिवाचा बचाव करण्याचा बाका वक्त त्यांच्यावर आला. राजपूत वीरांनी तो माग पत्करून जिवाचा बचाव करण्याचे ठरविले. कचाकच बाबुरचे सैन्य कापून फळी फोडून ते पार होत, पण असे करतांना