पान:बाबुर.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गादीवर-समरकंदवर राजा म्हणून राज्य करावे ही त्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. ती सिद्धीस नेण्याची त्याची धडपड भयंकर. होती. त्यासाठी त्याने अविरत प्रयत्न केले. अनेक संकटे ओढवून घेतली. कित्येक वेळां तो राज्यपदावरून फेकला गेला. या धकाधकीत अशा कांहीं विलक्षण घटना घडून आल्या की, तैमूरचे छोटेसे समरकंद व त्याचा तो छोटासा बादशहा ह्या गोष्टी पार नाहीशा होऊन तो हिंदुस्थानसारख्या अफाट देशाचा सम्राट् झाला. त्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी मोठ्या विलक्षण तव्हेने तडीस गेली. असा हा मोठा विचित्र इतिहास आहे. बाबुराचें चरित्रही मोठे गमतीदार आहे. ते वाचकांनी अवश्य वाचावें म्हणजे त्याचा प्रत्यय त्यास आल्यावांचून राहणार नाहीं. दि टीचर्स आयडियल पब्लिशिंग हाउसचे कुशल कर्णधार श्री. रा. न. शं. कुलकर्णी यांनी मोठ्या आपलकीने सहकार्य केल्याने या पुस्तकाच्या प्रसिद्धीचा योग जुळून आला. पुणे, विजयादशमी, शके १८७६ वि. ग. लेले