पान:बाबुर.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निवेदन बारा वर्षांपूर्वी १९४२ सालापासून लिहून ठेविलेल्या मोगल सम्राटांच्या चरित्रमालेपैकी पहिला बादशहा जहिरुद्दिन महंमद ऊर्फ बाबुर याचे छोटे चरित्र आज १९५४ सालीं विजयादशमीच्या सुमुहूर्तावर प्रकाशित होत आहे. जहिरुद्दिन महंमह ऊर्फ बाबुर हैं। नांव बरोबर असून त्याचे बाबर हे चुकीचे नांव रूढ झाले आहे. तेव्हां तो फरक आवर्जून लक्ष्यांत घ्यावा अशी विनंति आहे. बाबर म्हणजे सिंह अथवा वाघ या अर्थाचा शब्द पर्शियन भाषेत आहे. त्याचा बाबुर या शब्दाशीं कांहीही संबंध नाहीं. दिल्लीवर राजे म्हणून राज्य करणा-या मोगल राजांची चरित्रे मराठीत नाहीत, ती वाचकांस उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. तो मी यथाशक्ति केला आहे. | मोगल सम्राटांतील बाबुराचे चरित्र फार अपूर्व आहे. बाबुर स्वतः मोठा रसिक, चौकस व प्रतिभाशाली लेखक होता. त्याने स्वतः आपले आत्मचरित्र लिहिले आहे. ते रसिक वाचकाला मंत्रमुग्ध करून टाकणारे आहे. बापाच्या गादीवर तो वारसाहक्कानें राजा म्हणून प्रस्थापित झाला. त्या वेळी त्याचे वय केवळ अकरा वर्षांचे होते. त्याचा बाप निवर्तला आणि तो पोरका होऊन गादीवर आला. त्या वेळेपासून संकटांनी त्याचा पिच्छा पुरवला. त्याला सुखाचा दिवस दिसला हीं वा चांगल्या माणसांचा आसरा मिळाला नाही. तैमूरच्या