पान:बाणभट्ट.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६८ ) पार्वतीपरिणयांतील पद्ये कुमारसंभवांतील पद्यांहून अगदींच भिन्न प्रकारची व भिन्न कल्पनेचीं अशीं कांहीं आहेत, त्यांपैकी थोडीं खालीं दिली आहेत. - - आदौ प्रेमकथायिता हरमुखव्यापारलोला शनै- वींडाभारविघूर्णिता मुकुलिता धूमोमव्याजतः । पत्युः संमिलिता दृशा सरभसव्यावर्तनव्याकुला पार्वत्याः परिणीतिमंगलविधौ दृष्टिः शिवायास्तु नः || ह्या पद्यांत पार्वतीचा मुग्ध शृंगार कवीनें किती खुबीनें वर्णन केला आहे ! आरादंजलिपेयमल विकसन्मन्दारपुष्पोत्थितं सौरभ्यं पवनोपनीतमभितो धावन्त्यमी षट्पदाः । तंत्रीमण्डलमार्द्रयन्ति कणिका मन्दाकिनीपाथसा- मध्यन्तःकरणं च मे सुमहतीमालंबते निर्वृतिम् ।। ह्या पद्यांत नारदऋषि स्वर्गीतून हिमालयावर उतरत असतां मार्गातील देखाव्यांचें वर्णन करीत आहे, व तें चांगले साधलें आहे ! स्वायत्तसिद्धाखिलकामनानां तत्वे परस्मिन्परिनिष्टितानाम् । भवादृशामागमनोत्सवोऽयं न लभ्यते नूनमनातपुण्यैः ।। यांत हिमालयाकडे नारदऋषि आला असतां त्यानें नम्रपणानें त्याचा महिमा वर्णन आपल्यास धन्य मानिलें आहे ! उद्धृत्यामरदीर्घिकाजलभुवामंभोरुहाणां ततीः स्वैरं नन्दनपादपानभिमतानामूलमुन्मूल्य नः । हृत्वा वांच्छित वस्तुदानचतुरां तामर्जुनी दुर्जना: स्वर्गस्त्रैणकचग्रहं रचयितुं निःशंक मुघुंजते ।। यांत तारकप्रभृति दैत्यांनी दिलेल्या उपद्रवांचें हुबेहुब वर्णन केलें आहे. मुखरमधुपमालाचारुमौर्वीसनाथं त्रिभुवनजययोग्यं चापमंसे दधानः | मुखमुदित विलासं वीक्षमाणः प्रियायाः । सहमधुरिह मंद मंदमायाति कामः ।। यांत वसंतासह येणाऱ्या मदनाचें सुरेख चित्र कवीने दाखविले आहे.