पान:बाणभट्ट.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६१ ) 11 JAN 1994 यांनीं या नाटकाच्या संबंधाने आपला फारच कडक अभिप्राय दिला आहे. तो असा :- - पार्वतीपरिणय म्हणून एक नाटक बाणकवीच्या नांवाचें आमच्या पाहण्यांत आहे. हे त्या विख्यात कवीनेंच रचलें किंवा कसें, याचा लांब बाद करणें नलगे. जो यांतील एकदा अंक वाचील त्यास त्याच्या अप्रयोजक- पणाचा व ग्रंथकर्त्याच्या साहसाचा चमत्कार वाटल्यावांचून राहणार नाहीं. बाणकवीचें नांव, व कुमारसंभवांतून अजीबात चोरलेला एकंदर मजकूर हीं यांत वजा केली असतां ग्रंथकाराचा मूर्खपणा व धाडसाची शर्थ हीच खालची निवळ बाकी ! " हा अभिप्राय सर्वथैव योग्य आहे असे मला वाटत नाहीं. मग त्यांनी आपल्या अभिप्रायांत लिहिल्याप्रमाणे एकादाच अंक सरासरी पाहून अभि प्राय दिला कीं काय कोण जाणे! मला तर “ ग्रंथकाराचा मूर्खपणा व धाडसाची शर्थ हीच खालची निवळ बाकी " वाटली नाहीं ! आतां कुमार- संभवांतून अजीबात मजकूर चोरला, असें झणण्यापेक्षां कुमारसंभवांतील मजकूर ( गोष्ट ) घेऊन त्यावर बाणकवीनें हैं नाटक रचलें, अर्से म्हटलें असतें तर काय बिघडलें असतें ! एकाद्या ग्रंथांतील गोष्ट घेऊन तीवर नाटक वगैरे रचण्याचा परिपाठ सर्व देशांत सर्व काली आहे. त्याप्रमाणें हैहि नाटक रचलें असेल ! कुमारसंभवांतील गोष्टीचें नाटकाच्या रूपानें रूपांतर करून जेथल्या तेथें पात्रें घालून त्या त्या पात्रांस शोमण्यासारखी भाषा व कृति घालणे, हे देखील कांहीं समान्य काम नव्हें. ह्या नाटकांत कोठें म्हणजे फरक केलेच नाहींत असेंहि नाहीं; कवीस योग्य वाटलें, तेथे ते केले आहेत. कुमारसंभवांत फिरत फिरत येणान्या नारदानें पार्वतीस पित्याजवळ पाहून ही शिवांची अर्धीगी होईल' अर्से सांगितलें. एवढाच काय तो नारदाचा संबंध दाखविला आहे. पार्वतीपरिणयांत नारदाचें ( १ के० विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे 'कविपंचक' एकल छापलें आहे, त्यांत भवभूतीच्या निबंधांत बाणकवीचे नांवावर ही टीप दिली आहे. पान ९१. २ ' त्याच्या ' व ग्रंथकर्त्याच्या ' हीं पदें त्यांच्या लेखांत मागेपुढे पडली आहेत असें वाटतें! ३ " तां नारदः कामचर: कदाचित्कन्यां किल प्रेक्ष्य पितुः समीपे । समादिदेशकवधूं भवित्रीं प्रेम्णा शरीरार्धहरां हरस्य ॥"