पान:बाणभट्ट.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६० ) ! कल्पपर्यंत वर्षाव ( काव्यामृताचा ) करीत आहे! ही जयदेवकवीची उक्ति किती यथार्थ आहे, यासंबंधाने अभिनवबाणभट्टानेंहि याच अर्थाचें समर्थन आपल्या पद्यांत केले आहे ! तें असें:- - “ वन्द्यः कस्य न वाल्मीकिर्यस्य वाङ्मंजरीकणान् आदाय कवयोऽद्यापि निक्षिपन्ति स्वसूक्तिषु ॥ " किती समर्पक पद्य आहे हें। आद्यकवीचें रामायण व व्यासाचे महा- भारत यांतील बरेच प्रयोग व कल्पना कालिदासादिकांच्या काव्यांतून देखील आढळतात:- 66 -- यदा यदाच कौसल्या दासीवच्च सखीवच भार्यावद्भगिनीवच्च मातृवच्चोपतिष्ठति । सततं प्रियकामा मे मियपुत्रा प्रियंवदा न मया सत्कृता देवी सत्कारा कृते तव ॥,, वा. रा. अयो. कां. अ. १२ श्लो. ६८-६९. यांतील कल्पना फेरफार करून कालिदासाच्या पुढील पद्यांत प्रथित केली आहे, अर्से कोणाच्या लक्षांत येणार नाहीं ? " गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ । करुणाविमुखेन मृत्युना हरता त्वां वद किं न मे हृतम् ॥ रघुवंश - सर्ग. ८- श्लो. ६७. तेव्हां आतां ह्या दोघां आद्यकवींखेरीज बाकीच्यांनी एकमेकांचें चौर्य केलें असेच ह्मणावे लागेल ! आणि खरोखरीच पाहिले तर जयदेवकवीची उक्ति व ' व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ' ही विद्वज्जनोक्ति अगदी अयथार्थच आहे असे ह्मणतां येणार नाहीं ! अर्थसौदृश्यें व समानार्थक कल्पना तर परभाषेतील ग्रंथांतून सुद्धां साप- डतात. या नाटकांत सूक्ष्मदृष्टीने पाहिले असतां पुष्कळ ठिकाणीं या कवचें बरेंच कवित्व दिसून येतें ! तथापि प्रसिद्ध विद्वान् पुरुषाचा एकाद्या ग्रंथाविषयीं बरा वाईट अभिप्राय पडला ह्मणजे अर्थात् पुष्कळ लोकांचा त्याप्रमाणे ग्रह होणें साहजिकच आहे. ह्या नाटकाविषयीं असाच प्रकार झाला आहे. कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर • १ निबंधमार्लेत संस्कृत व इंग्लिश कबींचीं देखील जमून आलेली बरीच अर्थ- सादृश्ये दिली आहेत. र्ती पुष्कळांस माहीत असतीलच.