पान:बाणभट्ट.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४१ ) दत्ते " चा कर्ताहि सुबंधु नांवाचाच असावा. कालिदास, बाण इत्यादि नांवाचे अनेक नामधारी कवि झाले त्याप्रमाणे दोन वासवदत्ता व त्यांचे कर्ते दोन सुबंधुहि झाले असावे ! पाणिनीच्या सूत्रावरची प्राचीन टीका " कौशिका" व भट्टोजीदी- क्षिताची अर्वाचीन टीका ' सिद्धांतकौमुदी' त्यांतहि आख्यायिका काव्याचें " वासवदत्तिकः " हेंच उदाहरण घेतले आहे. प्रस्तुत उपलब्ध असलेल्या सुबंधूच्या वासवदर्तेत बाणकाव्यांतील कांहीं वाक्यें व वाक्यसमूहहि आढळून येतात. हर्षचरितांतल्या द्वितीय उच्छ्वा साच्या संध्याकालवर्णनांतील कांहीं भाग हल्लींच्या वासवदत्तेत आढळतो. यावरून कथाकाव्यकर्ता दुसरा सुबंधु हा बाणाच्या नंतरचा असावा. 'वश्य- वाणी कविचक्रवर्ती ' बाणाने हल्लींच्या नवीन वासवदत्र्त्तेतून चौर्य केलें अर्से कोणाच्या स्वप्नीं सुद्धां यावयाचें नाहीं ! याकरितां याबद्दल विशेष पुरावा द्यावयास नकोच. हर्षचरितांतील पुढील सायंकाळचें वर्णन हल्लींच्या वासव दत्तेत प्रायः जसेचें तसेंच आढळतें. १ सुबंधु हें नांव देखील फार प्राचीनकालापासून प्रसिद्ध आहे. ऋग्वेदांतील सर्वा नुक्रमांत सुबंधु हा एक स्तोत्राचा कर्ता आहे. २ काशिकावृत्ति ही दोघा वैयाकरणांनी केली आहे. जयादित्याने पहिल्या चार अध्यायांवर वृत्ति केली आहे व पुढच्या चार अध्यायांची राहिली होती, ती, पुढें वामनानें पुरी केली आहे. चिनी प्रवासी इसिंग यानें जयादित्याचा उल्लेख आपल्या लेखांत केला आहे. तो हिंदुस्थानांत येण्यापूर्वी सुमारे शंभर वर्षे अगोदर हा पंडित होऊन गेला होता. तेव्हां मुमारें सहाव्या शतकांत हा महावैयाकारण विद्यमान होता, असे उघड झालें. ३ 'निद्राविद्राणद्रोणकुलकलिलकुलायेपु कापेयविकलक पिकुले ध्वारामतरुपु, निजिंग- मिश्रति जरत्तरुकोटरकुटीकुटुम्बिनि कौशिककुले, मुनिकरसहस्रप्रकीर्णसंध्यावंदनोद- बिंदुनिकर इव दंतुरयति तारापथस्थली स्थषीयसि तारंकानिकुरंबे, अम्बरा श्रयिणि शर्वरीशबरीशिखंडे, खंडपरशुकण्टकाले कवलयति बाले, ज्योतिः शेषं सांध्यमंधकारा- वतारे, तिमिरतर्जननिर्गतासु दहनप्रविष्टदिनकरकरशाखास्विव स्फुरन्तीषु दीपलेखासु, अररसंपुटकीडनकथितावृत्तिष्विव गोपुरेषु, शयनोपजोपजुपि जरतीकथितकथे शिश- यिप्रमाणे शिशुजने, जरन्महिपमपीमलीमसतमसि जनितपुण्यजनप्रजागरे विजृम्भमाणे भीषणतमे तमीमुखे, मुखरितविततज्यधनुपि वर्षति शरनि कर मनवरतमशेषसंसारशेमपी- मुषि मकरध्वजे, रखाकल्पारम्भशोभिनि शम्भलीभाषितभाजि भजति भूपां भुजि- प्याजने, सैरन्ध्रीबध्यमानरशना जालजल्पाकजधनासु जनीपु | इ० ' ह. च. आवृ. १ पा. ८९-९० आणि वासव, कल, आ. इ. स. १८५९ पा. १६९-७०