पान:बाणभट्ट.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४० ) णेभ्यश्च या कात्यायनाच्या वार्तिकावर ) महाभाष्यांत आख्यायिका- काव्याची उदाहरणें 'वासवदत्ताख्यायिकामधीते वेद वा वासवदत्तिकः । सौमनोत्तरिकः । अशीं [ ठक् प्रत्ययांत ] दिली आहेत. यांवरून वासवदत्ता" व "सुमनोत्तरा" हीं आख्यायिका-काव्ये पतंजलीच्याहि पूर्वी होत असे लक्षांत येतें. तेव्हां हल्लींची वासवदत्ता इतकी प्राचीन ह्मणजे दोन हजार वर्षांपूर्वीची व अनेक कवींचा गर्व हरण करणारी आहे असे वाटत नाही. पूर्वीची हीं व दुसरी आख्यायिका काव्यें कालगतीनें हल्लीं नष्ट झालीं. असावी असे वाटतें. हल्लींची " वासवदत्ता " हें कथा-काव्य आहे. बाणानें वर्णिलेली "बासवदत्ता" ही प्राचीन आख्यायिका असली पाहिजे. प्रस्तावने॑तहि आख्यायिकेच्यासंबंधाने थोडें विवेचन केले आहे. मालतीमा- धवनाटकाच्या दुसन्या अंकांत 'वासवदत्ताच राज्ञे संजयाय पित्राद्त्त- मात्मानमुद्यनाय मायच्छदित्यादि' असें भवभूतीनें कामंदकीच्या तोंडी घातले आहे. हल्लींच्या वासवदत्तेत या संदर्भाचा मागमूसहि नाहीं ! यावरून बाण, भवभूति इत्यादि प्राचीन कवींनां माहीत असलेली वासवदत्ता निरा- ळीच असावी असे लक्षांत येतें. बाणानंतर थोड्या कालाने झालेल्या वाक्पति- राजकवीने गौडवध काव्यांत भास कालिदास इत्यादि कवींचा निर्देश केल्यावर हर्षचरितांतील क्रमाप्रमाणेच " सौबंधवे वधम्मि हाइयंदे अ आनंदो || सौंबंधवेच बंधे हरिचंद्रेच आनंदः । " असा त्या आख्या- यिकाकारांचा अनुक्रमानेंच नामनिर्देश केला आहे. तेव्हां पूर्वीच्या "वासव- १ ' अपि चार्य पुरा गीतः श्लोको वाल्मीकिना भुवि । 66 6 " न हन्तव्याः स्त्रिय इति यद्भवीपि प्लवंगम । सर्वकालं मनुष्येण व्यवसायवता सता १ “ पीडाकरममित्राणां यत्स्यात्कर्तव्यमेव तत् || 26 महाभा. द्रोणप. अ. १४३ श्लो. ६७-६८ 66 न हन्तव्यास्त्रियश्चेति यद्वीपि लवंगम | पीडाकरममित्राणां यच्च कर्तव्यमेव तत् || " , वा. रा. यु. कां. अ. ८१ महाभारतांत ' सर्वकालं ' इ० हें श्लोकार्ध अधिक आहे. दोहींत थोडा पाठभेद आहे. परंतु वाल्मीकीरामायणांतला श्लोक महाभारतांत घेतला यांत कांहीं संशय नाही. यावरून रामायण हे महाभारताच्या पूर्वीचें असल्याबद्दल उघड होतें.