पान:बाणभट्ट.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३ ) , लोकांच्या रीतीभाती, धर्म, आचार, पराक्रम इत्यादिकांचीं टिपणे करून घेतलीं. हुएनस्यांगच्या हिंदुस्थानांतील प्रवासकालच्या टिपणांवरून त्याच्या शिष्यांनी चिनी भाषेत दोन ग्रंथ केले आहेत. त्यांची फ्रेंच, जर्मन वगैरे भाषेत भाषांतरें होऊन व नंतर त्यांची इंग्रजीतहि भाषांतरें होऊन तीं प्रसिद्ध झाली आहेत. हुएनस्यांगनें जी माहिती दिली आहे, ती विद्वानांस बरीच संमत असल्याची प्रसिद्धि आहे. बाणाच्या वर्णनाशी हुएनस्यांगवर्णित बन्याच गोष्टींचा मेळ आणि हर्ष व बाण यांचा कालनिर्णय. हुएनस्यांगनें दिलेली नांवें, ह्मणजे उत्तरहिंदुस्थानचा राजा हर्षवर्धन, , त्याचा बाप प्रभाकरवर्धन, भाऊ राज्यवर्धन, बहीण राज्यश्री, प्रधान भानी, ( यास हर्षचरितांत भंडी असे झटले आहे ). तो युद्धांत हस्तिसैन्याचा उपयोग करीत असे, त्याचा भाऊ राज्यवर्धन, यास शत्रूने विश्वासघातानें मारलें, व नंतर तो शत्रूचा सूड उगविण्याकरितां व दिग्विजय करण्याकरितां निघाला; हर्ष व आसामचा राजा कुमारभास्करवर्मा यांची मैत्री होती. सत्याश्रय पुलकेशीबरोबर हर्षाचा संग्राम झाला. इत्यादि प्रकारची नांवें व गोष्टी हर्षचरितांतील नांवांशीं व गोष्टींशी जमतात. यावरून बाणकवीनें वर्णन केलेला हर्ष व हुएनस्यांगने वर्णन केलेला हर्षवर्धन हा एकच अर्से सिद्ध होतें, व सातव्या शतकांत हर्षराजा असल्याबद्दल खात्री होते. , १ हस्तिसैन्य बरोबर घेऊन हर्ष युद्धास जात असे, असें हर्षचरितांतील निरनि राळ्या ठिकाणच्या लेखांवरूनहि लक्षांत येतें:- 6 - असावकथयत् एप खलु देवस्यौपवाह्यो बाह्यं हृदय, जात्यंतरित आत्मा, बहि श्वराः प्राणाः, विक्रमक्रीडामुहद्दपशात इति यथार्थनामा वारणपतिः ' । 6 । प्रभातायांच शर्वयां प्रातरेव प्रतीहारमादिदेश | अशेषगजसाधनाधिकृतं स्कंद- गुप्तं द्रष्टुमिच्छामीति । 6 अतः शीघ्रं प्रवेश्यंतां प्रचारनिर्गतानि गजसाधनानि नक्षाम्यत्यतिस्वल्पमण्यार्य. परिभवपीडापावकः प्रयाणविलंबम् ' । " करेणुकयोह्यमानो दिग्विजयाय निर्जगाम महीपतिः ' २ शिलालेखांत व ताम्रपटांत हर्ष यास कोठें कोठें हर्षवर्धन असे हाटलें आहे; व हुएनस्यांग यानेंहि असेंच हाटले आहे. परंतु हर्षचरितांत मात्र हर्ष असेच आहे.