पान:बाणभट्ट.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२ ) मूलस्थानें व पुण्यक्षेत्रे पाहण्याकरितां हिंदुस्थानांत येत असत. इ० स० ६२९ या वर्षी चिनीयात्रेकरू हुएनस्यांग हा हिंदुस्थानांत आला होता. तो प्रथमतः काश्मीराकडून प्रवास करीत इ० स० ६३३-३४ या वर्षी नौलंद येथें आला. त्या ठिकाणीं तो पांच सहा वर्षे राहिला होता हर्षराजा- ची त्यानें भेट घेतली होती व त्याच्या सहवासास तोहि कांहीं दिवस होता. इ० स०६३९-४० यांत तो दक्षिणेकडे प्रवास करण्यास गेला. सत्याश्रय- पुलकेशीराजाचीहि त्यानें भेट घेतली होती दोन वर्षे प्रवास केल्यानंतर तो इ० स० ६४३-४४ च्या सुमारास प्रयाग येथें आला. तेथें गरीब गुरीब, भिक्षु वगैरे लोकांस हर्षानें पुष्कळ दानधर्म केला. तो त्यानें प्रत्यक्ष पाहिल्याबद्दल आपले प्रवासवृत्तांत लिहिले आहे. त्यानंतर हुएनस्यांग हा इ०स० ६४५ या वर्षी चीनदेशास परत गेला. याप्रमाणे त्याने सुमारें १६ वर्षे हिंदुस्थानचा प्रवास केला. इतक्या कालावधीत त्यानें ११० प्रदेश पाहून व तेथील अनेक राजांच्या भेटी घेऊन त्या त्या ठिकाणच्या ११२ वर्षे राज्य केलें. शुंगराजांपैकीं शेषटला + देवभूतिगुंग याला त्याचा काण्व प्रधान वसुदेव यानें दासीच्या मुलीस राणीचा वेष देऊन फसवून मारलें व त्याचें राज्य बळकावलें असे वाणाच्या हर्षचरितांतहि आहे. पुप्पमित्रराजाचा मुलगा अग्नि- मित्र याचें कालिदासाच्या मालविकाग्निमित्र नाटकांत वर्णन आहे. शुंगराजांनी ११२ वर्षे राज्य केलें. पुढे काण्त्र राजे झाले. त्यांनी ४५ वर्षे राज्य केले. नंतर आंध्रराजे व नंतर गुप्तराजे झाले. ह्या राजांनीं पांचव्या व सहाव्या शतकांत राज्य केलें. बाण- कवीच्या आजापणजांस गुप्तराजांचा आश्रय होता. गुप्तांच्या वेळेस हूणराजांनी हिंदु- स्थानचें राज्य घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गुप्तांनीं तो सिद्धीस जाऊं दिला नाही. गुप्तानंतर प्रतापवर्धन, 'राज्यवर्धन, हर्षववर्धन हे राजे झाले. प्रभाकरवर्धनाने हूणांचे कांही चालू दिले नाहीं. त्याचे पुत्र राज्यवर्धन व हर्षवर्धन यांनींहि हूणादिकांवर स्वाय करून त्यांचा अगदी मोड केला व हिंदुस्थानांत साम्राज्य स्थापिलें *अशोकानंतर महापराक्रमी हाणण्यासारखा असा हर्पराजा झाला. त्याच्या संबंधानेंच ह्या निबंधांत विवेचन केले आहे. १ हें बौद्धधर्मी लोकांचे स्थान गयेजवळ इशान्येस बारगांवांपासून सात मैलावर आणि बुद्धगयेपासून पन्नास मैलांवर आहे. + ' अतिस्त्रीसंगरतमनंगपरवशं शुंगममात्त्यो वसुदेवो देवभूतिं दासीदुहित्रा देवी- व्यञ्जनया वीतजीवितमकारयत् । '

  • चंद्रगुप्त, त्याचा पुत्र बिंदुसार, त्याचा अशोकवर्धन यांचे वर्णन विष्णुपु.

अ०४ यांत आहे.