पान:बाणभट्ट.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८ ) बन्याच कालानंतर हर्षाचा बाप प्रभोकरवर्धन किंवा प्रतापशील हा मोठा पराक्रमी राजा झाला. हा राजा मोठा सूर्यभक्त होता. हा हूणरूपहरिणांना सिंहासारखा, सिंधुराजाला ज्वरासारखा, गुर्जरराजांनां निद्रा येऊं न देणारा, गांधारराजरूपमत्तगजाची मस्ती जिरवणारा, लाटराजाचा उच्छेद कर- णारा, मालवराजाच्या लक्ष्मीरूपलतेस केवळ परशुच ! असा होता. प्रभा- कराच्या स्त्रीचें नांव यशोमती असें होतें. प्रभाकरवर्धनास सूर्याचे आराधनेने फार दिवसांनी दोन पुत्र व एक कन्या अशीं तीन अपत्ये झाली. मुलांची नावे राज्यवर्धन व हर्ष आणि मुलीचें राज्यश्री अशी ठेविली होती. मुलांचा मामेभाऊ भंडी यास त्याचे बापानें तो आठ वर्षांचा असतांच आपले भाचे राज्यवर्धन व हर्ष यांच्या सहवासास आणून ठेवले होतें. भंडींतहि लहानपणापासून पराक्रमाचा अंकुर दिसत होता. प्रभाकरवर्धनाने त्यास आपल्या पुत्राप्रमाणेच मानिलें होतें. तिघांचाहि अभ्यास बरोबरच चालत असे. पुढे ते तारुण्यांत येऊन पराक्रमाची कृत्यें करण्यासारखे झाले. नंतर त्यांच्या बापानें सद्गुणी मालवराजपुत्र- कुमारगुप्त व माधवगुप्त - यांस आपल्या पुत्रांच्या तैनातीस दिलें. राज्यश्री- सहि नृत्यगीतादि कला शिकविल्या होत्या. ती वयांत आली तेव्हां राजानें स्त्रीपुत्रांच्या विचारें पुष्कळ मागण्या आल्या होत्या तरी ' मौखरी हैं कुलीन क्षत्रिय घराणे लक्षांत आणून त्या वंशांतील सद्गुणी ग्रहवर्मा यास आपली कन्या मोठा समारंभ करून दिली. सर्व मुले तारुण्यांत आलेली पाहून राजास फार आनंद झाला. त्यांत वडील पुत्र राज्यवर्धन हा ( कवचहर ) पराक्रमाचीं कृत्ये करण्यासारखा झालेला 'विक्रमरसानुरोधिनि वयास वर्तमानः ' पाहून प्रभाकरवर्धनाने त्यास उत्तरेकडे हूणांवर पाठविलें. हर्षहि आपले भावाबरोबर हिमालयापर्यंत गेला. तें स्थान मृगया करण्यास -

, १ हर्षाच्या बापाचें नांव प्रभाकरवर्धन व आईचें यशोमती; आजाचें नांव आदित्यवर्धन व आजीचें महासेनगुप्ता; पणजाचें नांव राज्यवर्धन, पणजीचे अप्सरादेवी; निपणजाचे नांव नरवर्धन आणि निपणजीचें वज्रिणीदेवी असें होतें. हर्षाचा बाप, आजा व पणजा हे तिघेहि सूर्यभक्त होते. परंतु हर्षाचा वडील भाऊ राज्यवर्धन हा चौद्ध होता, असे ताम्रपत्रांतील लेखावरून कळते. हर्ष हा शिवभक्त होता हैं हर्षचरिता- वरून व ताम्रपत्रांतील 'परममाहेश्वर ' या पदावरूनहि स्पष्ट होतें. परंतु पुढे तोहि बौद्ध झाला असावा असे लक्षांत येतें. हा मजकूर ताम्रपत्रांतून घेतला आहे.