पान:बाणभट्ट.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)


प्राणी दृष्टीस पडल्यावर बाणास आश्चर्य वाटून त्याच्या मनांत आलें कीं, सृष्टिकर्त्यानें इतके प्राणी निर्माण केले असतां पंचमहाभूतांचा क्षय, परमाणूंचा अभाव,कालाचा शेवट, आयुष्याचा नाश आणि आकारांचा अंत कसा झाला नाही?
 मग बाणाबरोबर असलेला मेखलक तेथील पाहरेकन्यांनी ओळखिला. तेव्हां तो बाणास म्हणाला. आपण येथेंच थांबावें, मीं आंत वरदी देऊन येतों. अर्से म्हणून तो गेला व कांहीं वेळाने मुख्य चोपदारास बरोबर घेऊन आला, आणि म्हणाला; ' हो राजाधिराजाचा मुख्य चोपदार आहे. याचें नांव पारियात्र.' तितक्यांत तो बाणास मुजरा करून म्हणाला, 'महाराज प्रसन्न आहेत व भेट घेण्यास उत्सुक आहेत, तरी दर्शनास चलावें तें ऐकून बाणाला फार आनंद वाटला. कारण ' स्वामी प्रसादोन्मुखः ईश्वरीप्रसाद ( शुभ शकुन ) मानून तो त्याजबरोबर गेला. वाटेनें हर्षाचा बस- ण्याचा पर्वताएवढा दर्पशात नांवाचा हत्ती होता, त्याची त्यानें बराच वेळ गंमत पाहिली, मग तो हर्षराजाकडे गेला. हर्षाला पाहतांच वाणास फारच हर्ष झाला. व त्या आनंदाच्या भरांत त्याच्या मुखावा उद्गार निघाले ते फारच खुबीदार व मार्मिक आहेत. त्यांतील श्लेष हर्पराजा हा केवळ सद्गुणांचा पुतळाच असल्याची साक्ष देत आहेत. त्या वर्णनांत त्यानें हर्षाचें 'अत्यमर


 १ 'मेखलकस्तु दूरादेव द्वारपाललोकेन प्रत्यभिज्ञायमानः 'तिष्ठतु' तावत्क्षणमात्रमत्रै- व पुण्यभागी' इति तममिधायाप्रतिहतः पुरः प्राविशत् ।'
 २ ' एप खलु महाप्रतीहाराणामनन्तरश्चक्षुष्यो देवस्य पारियात्रनामा दौवारिकः ।
समनुगृण्हात्वेनमनुरूपया प्रतिपत्या कल्याणाभिनिवेशी इति । ' दौवारिकः समुपसृत्य कृतप्रणामो मधुरया गिरा सविनयमभाषत । आगच्छत प्रविशत दर्शनाय कृतप्रसादो देव इति । '
 ३ ' दृष्ट्वा चानुगृहीत इव निगृहीत इव साभिलाष इव तृप्त इव रोमांचामुचा मुखेन मुञ्चन्नानन्दब।प्पबिन्दून् दूरादेव विस्मयस्मेर : समचिन्तयत् । सोऽयं सुजन्मा मुगृहीतनामा, तेजसां राशि: चतुरुदधिकेदारकुटुंबी, भोक्ता ब्रह्मस्तंभफलस्य सकलादि- राजचरितजयज्येष्ठमल्लो देवः परमेश्वरो हर्पः । एतेनच खलु राजन्वती पृथ्वी.
 नास्य हरेरिव नृपविरोधीनि बालचरितानि | न पशुपतेरिव दक्षोद्वेगकारीण्यैश्वर्य- विलसितानि । न शतक्रतोरिव गोत्रविनाशपिशुना: प्रवादाः । न यमस्येवातिवल्लभानि दंडग्रहणानि । न वरुणस्येव निस्त्रिंशग्राहसहस्ररक्षिताः रत्नालयाः न धनदस्येव

[ पुढे चालू ]