पान:बाणभट्ट.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)


व्यसन होय. ' असे उद्गार त्याने काढले आहेत ते अगदी यथार्थ आहेत. या पूर्वी हर्षराजाचे दरबारी बाणाचें येणे जाणे नव्हतें, व त्याच्या पूर्वजांचेंहि नव्हते. तेथें त्याचा कोणाशीं परिचयहि नव्हता. ह्या वर्णनांत त्या ठिकाणी विद्येचें फारसें कौतुकहि नाहीं ! असेंहि बाणानें झटलें आहे. यामुळे बाणास प्रथमतः हर्षराजाकडे जाण्यास मोठी काळजी वाटली होती. तथापि 'फलम- तिबंधी धीमद्भिरपहरणीयः कालातिपातः ' ' व्यर्थ काल घालविणें ठीक नाहीं' या कृष्णराजाच्या लेखावर भिस्त देऊन व श्रीशंकरावर भरवसा ठेवून त्यानें जाण्याचा निश्चय केला.

बाणाचें हर्षराजाकडे प्रयाण, त्याची कसोटी,


हर्षाचें गुणग्राहित्व व बाणाची हर्षावर छाप.

हर्षराजाकडे निघण्याच्या दिवशीं वाणानें प्रातःस्नान व संध्यादि कमें केल्यावर प्रथम शंकराचें दुग्धाभिषेकपूर्वक पूजन केले. नंतर होमहवन करून ब्राह्मणांनां दानधर्म केला व गाईला प्रदक्षणा केली. त्याची आत मालती इनें त्याचे प्रस्थानमंगल केले. त्यानें तिला व गुरुजनांना नमस्कार केले. त्यांनींहि त्याला शुभाशीर्वाद दिले. मग तो प्रीतिकूट गांवाहून निघून व चंडिकवन उल्लंघून मल्लकूट हा गांवीं गेला. तेथे त्याचा आप्त जगत्पति यानें बाणाचे चांगले आदरातिथ्य केलें. दुसरे दिवशीं भागीरथी उतरून तो यष्टि- ग्रहक नांवाच्या गांवीं रात्रीं राहिला व दुसरे दिवशीं जवळच हर्षराजाची छावणी होती तेथें तो गेला.
 त्या ठिकाणी विश्रांति घेतल्यावर प्रहरदिवस राहिला तेव्हां तो मेखलका- बरोबर हर्पराजास भेटण्याकरितां निघाला. वाटेनें मांडलिक राजांची शिबिरें व बाहेरून आंत व आंतून बाहेर येणारे जाणारे हजारों हत्ती, घोडे व उंट इत्यादिकांची मौज, पहात तो चालला असतां राजाच्या छावणींत असंख्य


 १ ' किं करोमि । अन्यथा संभावितोऽस्मि राज्ञा । निर्निमित्तबन्धुना च संदि- ष्टमेवं कृष्णेन । न च तत्र मे पूर्वजप्रवर्तिता प्रीतिः । न राजवल्लभपरिचयः । न वि- द्यातिशयकुतूहलम् । अवश्यं गंतव्यं । सर्वथा भगवान्पुरारातिर्भुवनगुरुर्गतस्य मे सर्वे सांप्रतमाचरिष्यति ' इत्यवधार्य गमनाय मतिमकरोत् ।
 २ 'अभवच्चास्य जातविस्मयस्य मनसि कथमिवेदमियत्प्रमाणं प्राणिजातं जनयता प्रजासृजां नासीन्महाभूतानां वा परिक्षयः, परमाणूनां वा परिच्छेदः कालस्य वान्तः आयुषो वा व्युपरमः आकृतीनां वा परिसमाप्तिः' इति ।