पान:बाणभट्ट.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५ )


व खोटेंना सांगून हर्षराजाचे मनांत बाणकवीविषयीं वाईट ग्रह उत्पन्न केला होता, परंतु हर्षाचा बंधु कृष्णराजे हा सज्जन व विद्वान् यांच्या पक्षा- चा असल्यामुळे त्यानें बाणकवीविषयीं हर्ष राजाच्या मनांत विघ्नसंतोषी लो- कांनी भरविलेला दुर्भह काढून टाकला ! ठीकच आहे, कृष्णराजासारखे परो- पकारी व चतुर पुरुष असतात, ते थोरांजवळ समयोचित बोलून कार्य साधून घेतात ! " कालमयुक्ता खलु कार्यविद्भिविज्ञापना भर्तृषु सिद्धिमेति । " यथाकाली स्वामीजवळ विनंति केली असतां ती सिद्धीस जाते ! ही कवि- कुलगुरूची उक्ति किती यथार्थ आहे! असो, कृष्णराजाने बाणास हर्षराजाचे भेटीस येण्याविषयीं जासुदाबरोबर पत्र पाठवून मोठ्या आगत्यानें बोलाविलें.
 उन्हाळ्यांत एके दिवशीं वाण भोजन करून दुपारी आपल्या घरी बसला असतां बणाचा चंद्रसेन नावाचा बंधु घाईघाईनें येऊन ह्मणाला, ' राजाधि- राज हर्षराजाचा बंधु कृष्णराज याजकडून दूत आला आहे. ' तेव्हां ' त्याला लवकर घेऊन ये' असे बाणाने सांगितले. त्याप्रमाणे त्यानें त्याला आणून बाणास भेटविलें. तेव्हां त्यानें नमन करून बाणास एक पत्र दिलें. त्यांत ‘ मेखलक तोंडी सांगतां सर्व कळून येईल. आपण कालक्षेप न करतां लवकर निघून यावें. ' अर्से होतें. मग मेखलकानें कृष्णराजाचा निरोप जो सांगावयाचा तोहि त्यास सांगितला. त्यांत त्याची बाणकवीविषयी फारच कळकळ दिसून आली ! तो ह्मणाला, एक गोत्र, एक जात, एकत्र वाढणें, एकत्र सहवास, वारंवार भेटणे, एकमेकावर प्रेम करणे, उपकार करणें, समानशील असणे, इत्यादि गोष्टी स्नेह होण्यास कारण होतात; परंतु जवळ असलेल्या बंधूप्रमाणे तुमच्यावर कारणावांचून मला प्रेम करावेसे वाटतें ! दुर्जनांनी तुमच्या लहानपणाच्या स्वच्छंद वर्तनाबद्दल महाराजांच्या मनांत भलतेंच भरवून त्यांचें मन कलुपित केले होतें, परंतु यांत कांही अर्थ नाही.


 १ हा सावत्र किंवा चुलतबंधु असावा.
 २“तथा भूते च तस्मिन्नत्युप्रे ग्रीष्मसमये कदाचिदस्य स्वगृहावास्थितस्य भुक्तवतोऽप- राहूणसमये भ्राता पारशवश्चन्द्रसेननामा प्रविश्याकथयत् । 'एप खलु देवस्य चतुः समुद्राधि- पतेः सकल राजचक्रचूडामणिश्रेणीशाणकोणकपण निर्मलीकृत चरणनखमणे: सर्वचक्रवर्ति- नां धौरेयस्य महाराजाधिराजपरमेश्वरश्रीहर्षदेवस्य भ्रात्रा कृष्णनाम्ना भवतामन्तिकं प्रज्ञाततमो दीर्घाध्विगः प्रहितो द्वारमध्यास्त ' इति । सोऽब्रवीत् - ' आयुष्मन्, अवि लंबितं प्रवेशयैनम्' इति । "