पान:बाणभट्ट.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४ )


आणि नारायण, पंडित-वारवाण व वासवाण अक्षरकवि-(प्रास जुळविणारा?) वेणीभारत, प्राकृतांत काव्य करणारा वायुविकार, भाट- अनंगवाण व सूचि बाण, जोगीण चक्रवाकिका, विषवैद्य मयूरक, तांबूल देणारा-चंडक, वैद्यपुत्र मंदारक, पौराणिक सुदृष्टि, सोनार-चामीकर, जवाहिन्या - सिंधुषेण, लेखक- गोविंदक, चितारी- वीरवर्मा, मातीची चित्रे करणारा-कुमारदत्त, पखवाजी- जीमूत, गवई सोमिल व ग्रहादित्य, शिल्पकर्म करणारी कुरंगिका, पावा बाजविणारे मधुकर व पारावत, गाण्याचे वस्तादजी दर्दुरक, हातपाय रगड. णारी-केर लिका, नृत्य करणारा-तांड विक, द्यूत खेळणारा-आखंडल, धूर्त भीमक, नट- शिखंडक, नृत्य करणारी हरिणिका, बौद्ध भिक्षु-सुमति, श्रमण - वीरदेव, गोष्टी सांगणारा-जयसेन, शैव-वऋघोण, मंत्रसाधन करणारा कराल, पाताल- मार्ग शोधणारा लोहिताक्ष, धातुवाद ( किमया? ) जाणणारा - विहंगम, वाद्य- भांड करणारा कुंभार दामोदर, इंद्रजाल दाखविणारा गारोडी- चकोराक्ष आणि संन्यासी ताम्रचूड. ह्या व आणखी दुसन्या मंडळीसह तो कौतुकानें देश पा- हाण्यास व फिरण्यास निघाला.
 तो ह्या मंडळीच्या संगतीनें चालत असल्यामुळे प्रथम मोठमोठ्यांच्या उपहासास पात्र झाला. तथापि पुढे लवकरच आपल्या पूर्वजांची विद्वत्ता व मान्यता हीं त्याच्या लक्षांत येऊन त्याच्या मनाचा कल बदलला व तो अनेक विद्वान् गुरूंच्या सेवेनें विद्या संपादून व मोठमोठचा राजदरबारी जाऊन परत घरीं आला. तेव्हां त्याच्या आप्तमित्रांनीं त्याचा मोठा आदरसत्कार केला. मग तो बालपणच्या मित्रमंडळींत परमानंदानें राहिला. त्या कालच्या आनंदास त्यानें मोक्षसुखच म्हटले आहे! बालपणांतील मित्रमंडळीच्या सहवाससुखास बाणकवीनें मोक्षसुखाची उपमा दिली आहे ती किती यथार्थ आहे !

हर्षाचा बंधु सज्जनकृष्णराज व त्याचें वाणकवीविषयीं


प्रेम व निरोप वगैरे.


बाणाचें राहणें हर्षराजाच्या राज्यांतच होते. कांहीं दुर्जनांनीं अधिक उणें



 १' ससंस्तवप्रकटितज्ञातेयैरा सैरुत्सवादवस इवानंदिताभ्यागमनो बालमित्रमण्ड- लस्य मध्यगतो मोक्षसुखमिवान्वभवत् ।' ह. च, उ. १
२दुर्जनाच्या संबंधार्ने कादंबरीच्या आरंभी बाणानें याप्रमाणे उद्गार काढले आहेत:-

' अकारणाविष्कृतवैरदारुणादसज्जनात्कस्य भयं न जायते ।


विषं महाहेरिव यस्य दुर्वच : सुदुःसहं संनिहितं सदा मुखे ॥ '