पान:बाणभट्ट.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२४ ) यांत पुत्राचा विनय व त्याचे मातेविषयी प्रेम हीहि कवीनें यथायोग्य दाखविली आहेत ! यावरून व दुसऱ्या अनेक गोष्टींवरून आपल्या कवीस मनुष्यादिकांच्या नानाविध मनोवृत्तींची चांगली पारख होती असें लक्षांत येतें. चंद्रापीडाचा दहा वर्षेपर्यंत विद्याभ्यास झाल्यावर त्यास त्याचा बाप तारापीड यानें विद्यालयांतून घरी आणिल्यावर त्यास यौवराज्याभिषेक करण्याचे ठरलें. तेव्हां तो प्रधान शुकनास याचे भेटीकरितां गेला असतां त्यानें लक्ष्मीच्या अंगीं अनेक दोष असतात, याकरितां त्यांपासून सावध राहण्याकरितां त्यास प्रौढ व गंभीर असा फारच मोठा उपदेश केला आहे. त्यांतील कांहीं भाग येथें घेतला आहे. यांत अनेक श्लेषादि अलंकारहि आहेत. हे प्रकार तर आपल्या कवीस अगदींच साहजिक साधले आहेत व कोणत्याहि विषयावर प्रौढ व खुबीरदार वर्णन करणे आपल्या कवीस करतलामलकवत् साधलें आहे. व ह्मणूनच विद्वान् व गुणज्ञ हर्षराजाने त्यास वश्यवाणिकविचक्रवर्ती " अशी पदवी दिली होती ती ठीकच ! 66 “विरला हि तेषा ( राज्ञां ) मुपदेष्टारः | प्रतिशब्दक इव राजवच- नमनुगच्छति जनो भयात् । उद्दामदर्पश्वयथुस्थगितश्रवणविवराश्रो- पदिश्यमानमपि ते न शृ॒ण्वन्ति । शृण्वन्तोपि च गजनिमीलितेनावधी- ते रयन्तः खेदयन्ति हितोपदेशदायिनो गुरून अहंकारदाहज्वरमूर्छान्ध- कारिता विहला हि राजप्रकृतिः । अलीकाभिमानोन्मादकारीणि धनाने । राज्यविषविकारतन्द्रमदा राजलक्ष्मीः । -" आलोकयतु तावत् कल्याणाभिनिवेशी लक्ष्मीमेव प्रथमम् । इयं हि सुभटखड्गमण्डलोत्पलवनविभ्रमभ्रमरी लक्ष्मी: । क्षीरसागरा- त्पारिजातपल्लवेभ्यो रागम् | इंदुशकलादेकांतवक्रताम् | उच्चैःश्रवस- चंचलताम् | कालकूटान्मोहनशक्तिम् । मदिराया मदम् | कौस्तुभम र तिनै टुर्यम् । इत्येतानि सहवासपरिचयवशाद्विरहविनोदचिह्नानि गृहीत्वेवोद्रता । न ह्येवंविधमपरमपरिचितमिह जगति किंचिदस्ति । यथेयमनार्या । लब्यापि खलु दुःखेन पारिपालयते । दृढगुणपाशसंदा- ननिष्पन्दी कृतापि अपक्रामति । उद्दामदर्पभटसहस्रोल्ल|सिलतापंजर- विघृतापि अपकामति । मदजलदुर्दिनांधकारगज घटितघनघटाटोपप- रिपॉलिताऽपि प्रपलायते । न परिचयं रक्षति नाभिजनमीक्षते न