पान:बाणभट्ट.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९२ ) सोसबतें, मला पापिणीला तर आशाच नाहीं, तेव्हां तें कोठून सोसणार? तर आतां जन्मांतरीं तरी प्रियसखीचा समागम व्हावा असें मी इच्छितें ! मग ती चंद्रपीडाजवळ गेली आणि त्याच्या पायांवर आपले मस्तक ठेवून त्याचे पाय आपल्या मांडीवर घेऊन बसली. कादंबरीचा हस्तस्पर्श होतांच चंद्रापीडाचे शरीर तेजस्वी दिसूं लागले व त्यापासून चंद्रासारखें तेज निघून आकाशांत गेलें व त्याबरोबर अशी आकाशवाणी झाली की, “वत्से महाश्वेते, पुंडरीकाचें शरीर माझ्या लोकीं अमृतरूपी माझ्या तेजानें सचेतन होत आहे. चंद्रापीडाचें शरीर हे माझेंच अविनाशी रूप आहे, कादंबरीच्या स्पर्शाने तें जीवंत होईल. याकरितां शाप संपेपर्यंत त्याचे नीट रक्षण करावें. कादंबरीचा व याचा लवकरच समागम होईल. " ते ऐकून पत्रलेखेवांचून सर्वांना मोठाच चमत्कार वाटला. पत्रलेखा तर त्या तेजाच्या शीतलस्पर्शाने सावध होऊन भूतसंचार झाल्यासारखी होऊन इंद्रायुधास धरून त्यासुद्धां तिनें आच्छोदसरोवरांत उडी टाकली. त्याच वेळेस त्यांतून एक तपस्वीकुमार निघाला, व महाश्वेतेजवळ जाऊन ह्मणाला, 'मला ओळखिलें कां ! " तेव्हां ती गडबडीनें उठली आणि त्यास नमस्कार करून ह्मणाली, “भगवन् कपिंजला ! प्रिय पुंडरीकाचें काय वर्तमान आहे?" तो ह्मणाला, " ज्यावेळी पुंडरीकाचें शरीर घेऊन तो दिव्य पुरुष आकाशांत चालला, त्यावेळी मी त्याचे मागोमाग गेलो. पुढे तो चंद्रलोकीं गेला तेथें मला पाहून तो ह्मणाला, 'कपिंजला, मी चंद्र आहें, समजलास ? मी सर्व जगावर अनुग्रह करण्याकरितां प्रकाशलों असतां मदनपीडेनें व्याकुळ होऊन यानें प्राण सोडला.' त्यावेळी यानें मला शाप दिला कीं, ' हे दुष्ट- चंद्रा ! माझ्या प्राणप्रियेबरोबर समागमसुख होण्यापूर्वी तूं माझें प्राणहरण केलेस, त्या अर्थी तूंहि मनुष्यलोकी उत्पन्न होऊन मजसारखाच जन्मोजन्मीं दुःखानुभव घेशील. , असा त्याचा शाप ऐकून मला राग आला व मींहि त्यास उलट शाप दिला कीं, " तूंहि मजबरोबरच समदुःखी होशील. " नंतर महाश्वेतेचा व याचा संबंध जडला आहे असे लक्षांत आलें. वत्सा, महाश्वेता तर मजपासून उत्पन्न झालेल्या गंधर्वकुलांत जन्मली, व तिर्ने यास बरिलें आहे. यासाठी मला याजबरोबर मनुष्यलोकी दोनवेळ जन्म घेतलें 66