पान:बाणभट्ट.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९१ ) मिळालें नाहीं, तर तें जन्मांतरीं तरी मिळो !' असें बोलतां बोलतां त्यानें आपले डोळे फाडले व त्याचें हृदयहि दुभंग झाले. इतक्यांत तरलिका धावत जाऊन चंद्रापीडास धरून ह्मणाली, 'देवि, महाराजाकडे बघ. यांची अवस्था फार कठिण दिसते ! यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला व डोळ्यां- च्या बाहुल्या आंत गेल्या!' असें झणून ती मोठ्यानें रडूं लागली. महाश्वेता- हि त्याची ती अवस्था पाहून निश्चेष्ट पडली. त्यावेळी चंद्रापीडाबरोबर आलेल्या लोकांनी तर रडून रडून आकांत केला ! इकडे चंद्रापीड आल्याची बातमी कादंबरीस समजतांच ती फार उतावीळ झाली. मग ' महाश्वेतेच्या भेटीस जाते' असे तिनें आईबापांस सांगून व घाईघाईनें शृंगारवेष करून व सानंद होऊन मदलेखा व पत्रलेखा यांसह ती महाश्वेतेच्या आश्रमाजवळ येऊन पोहोंचली. तेथें येऊन पहाते, तो चंद्रावराहत जशी रात्र, तशी प्राणानें विरहित चंद्रापीडा- ची तनु तिच्या दृष्टीस पडली. तेव्हां दुःखावेशानें भूमीवर पडणाया कादंबरीस मदलेखने मोठयानें आक्रोश करीत धरून ठेविलें कादंबरीचा हात सुटून पत्रलेखाहि भूतलावर निश्चेष्ट पडली. मग कादंबरी सावध झाल्यावर मदलेखा तिच्या पाया पडून ह्मणाली, प्रियसखि, दुःखाने • तुझें हृदय फुटलेंसें दिसतें. तुझ्या दुःखास पारावार नाहीं हें खरें, परंतु तुझ्यावांचून मातृपितृकुळें नष्ट होतील हे लक्षांत आण. ' मग ती ह्मणाली, ‘ वेडे ! प्रियकराची अवस्था पाहिल्याबरोबर ज्याचे तुकडे झाले नाहीत, अर्से मेले वज्रापेक्षां कठोर हें हृदय कोठून फुटणार ? वांचण्यापासून जिला सुख वटत असेल तिला आप्तमित्रांची आशा. मला त्यांचा काय उपयोग ? माझ्या हातीं आतां प्रियतमाचें शरीर सापडले आहे. हा लाभ का लहान आहे ? तर आतां सहगमनानें सर्व दुःखाचा मी शेवट करतें ! स्वर्गास चाललेल्या प्रियतमाच्या मागोमाग जाण्याची आनंदाची वेळ आली असतां रहूं तरी कशाला ? माझ्या वल्लभानें येथे मजकरितां येऊन जीवित सोडलें असतां मीं जीवंत राहावें काय? तूं व इतर सख्यांनी ज्याला शीतलोपचार केले असतां जे मदनाच्या दाहानें तसेंच राहिले ते शरीर प्रियतमाच्या आलिंगनामृतानें आतां शीत करतें !' मग ती मदलेखेचे हात हिसकून देऊन महाश्वेतेजवळ गेली आणि तिच्या गळ्यात मिठी मारून ह्मणाली, 'प्रियसखि, तुला प्रियसमागमाची आशा आहे तीमुळे तुला दुःसह दुःख