पान:बाणभट्ट.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरार्धातील संक्षिप्त कथानक. " पत्र लेखे, या राजपुत्राची व माझी आतां कसची गांठ पडते? त्याला इकडे येण्याला आतां अधिक तें काय आहे ? त्याच्या भेटीच्या दिवशीं संध्याकाळच्या वेळी जिकडे तिकडे प्रफुल्लित झालेल्या पुष्पांवरून मंद व शतिल व सुगंध वायु वाहत होता. पूर्णचंद्र गगनमंडलास सुशोभित करीत होता. मौक्तिकारीलेवर चंदनाचा रस शिंपडल्यामुळे त्याचे बिंदु दिसत होते, त्यामुळे चंद्रकरांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांचच उभे राहिले आहेत काय असें भासत होतें ! अशा वेळी क्रीडापर्वतावरील हिमगृहांत मौक्तिक- शिलेवरच्या शय्येवर तळमळत पडलेली व त्यावेळी चंद्रापीडाने पाहिलेली तीच ही हतभाग्य कादंबरी ! तो येथे फार वेळ होता तरी ह्या मेल्या डोळ्यांनी त्यास पोटभर पाहिलें सुद्धां नाहीं, ह्याचा बोल दुसन्या कोणाकडे लावावयाचा आहे ? पण हे बघ, पत्रलेखे ! मला आतां त्याचें कांहींच वाटत नाहीं. मला दैवानें आतां निराळाच एक हृदयवासी कुमार अर्पण केला आहे. तो कोणाला दिसाव याचा नाहीं, कधीं सोडून जावयाचा नाहीं. जिकडे जावें तिकडे तो आपला आहेच! तर आतां त्या अज्ञजनास फसविणान्या व सोडून जाणान्या कुमाराची गोष्ट कशाला पाहिजे !" असें बोलतांनां तिच्या डोळ्यांतून अश्रु बाहूं लागले व ती जागचे जागीं डोळे मिटून तटस्थ राहिली ! असे तिचें भाषण ऐकून माझ्या मनांत आले की, " विरहिणी स्त्रियांस हृदयवासी कुमाराची चांगलीच करमणूक होते ! त्याच्या समागमापासून कधीं कन्याधर्म दूषित व्हावयाचा नाहीं, कांहीं नाहीं ! त्याजबरोबर बिलास केल्याबद्दल कोणास मागमूसहि समजावयाचा नाहीं, तेव्हां है साधन बरें आहे !' असे माझ्या मनांत घोळत होतें, तो कादंबरीचें अनुरक्त हृदयच काय असे आरक्त झालेले सूर्यबिंब दिसेनासे झालें. त्यावेळी सुगंधि तैलानें पूर्ण अश। दीपिका घेऊन दासी तिच्या सभोवती येऊन उभ्या राहिल्या. तेव्हां ज्योतींचीं प्रति तिच्या लावण्यांत बिंवल्या. मुळे जशी काय मदनानें सोडलले बाणच ही धारण करते आहे असे