पान:बाणभट्ट.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७४ ) देवीच्या मनांत ' पत्रलेखेने तरी कांहीं दिवस येथें राहावें, ' असे आहे. तें ऐकून पत्रलेखेस धन्य समजून त्यानें तीस तेथें रहावयास सांगितलें व आपण निघून सैन्याजवळ येतो तो पित्याकडून आलेला जासूद त्याचे दृष्टीस पडला. त्यास तो कुशल विचारूं लागला तो त्यानें प्रणाम करून पत्र दिलें. , तिला तें वाचून पाहतां त्यांत ' फार दिवस झाल्यामुळे तुझ्या भेटीची फार उत्कंठा वाटत आहे, याकरितां पत्रदर्शनीं निघून यावें,' असा मजकूर होता. मग तो पित्याची आज्ञा मान्य करून घोड्यावर बसला होता तसाच निघाला. जाते वेळीं मेघनादास झणाला. " तूं मागून पत्रलेखेस घेऊन ये. पोहचविण्याकरितां केयूरक येईल, त्याजबरोबर देवी कादंबरीस माझी विनंति कळवावी की,' कंपटस्नेह दाखवून मी गेलों ! ' असे देवीस वाटण्या- चा संभव आहे, परंतु पित्याची आज्ञा मला मोडतां येत नाहीं. तथापि असे खात्रीने सांगतों की, फिरून देवीचें दर्शन घेतल्याखेरीज मी राहणार नाहीं. तसाच महाश्वेतेसहि माझा आदरपूर्वक नमस्कार कळवावा. " नंतर तो वैशंपायनास ह्मणाला, " सर्व सैन्याचा बंदोबस्त ठेऊन सर्वोस सांभाळून घेऊन ये. मी पुढे जातों. " , कादंबरीच्या विरहानें चंद्रापीडाच्या मनाची स्थिति नीट नव्हती, तरी तो सेवकास उज्जयनीकडील वर्तमान विचारीत चालला होता. मग घोर अरण्यें व गांवें यांचें अतिक्रमण करीत सायंकाळी तो एका चंडिकेच्या देवालयाजवळ येऊन पोहचला व तेथं विश्रांति घेण्याचा त्यानें विचार केला. मग तो घोड्यावरून उतरून देवीचे दर्शनास गेला. त्या ठिकाणी दर्शन घेतल्यावर एक देवीभक्त द्रविड ब्राह्मण त्याचे दृष्टीस पडला. त्याच्या विक्षिप्त पणाची चंद्रापडास बरीच करमणूक झाली. त्यानें त्यास पुष्कळ द्रव्य दिलें. मग तो आपल्या उतरण्याचे जागीं गेला. त्यास तेथें खाणे पिणे वगैरे कांहीं- एक गोड लागले नाहीं. त्याचें लक्ष कादंबरीकडे गेल्यामुळे त्यास अगदी चैन पडेनासे झालें, व त्या चिंतनांतच सर्व रात्र संपली. प्रातःकाळ होतांच तो तेथून तातडीनें निघून उज्जयनीस येऊन पोहोचला. त्यास पाहतांच राजास व सर्वोस फार आनंद झाला. मग त्यानें “वैशंपायन मागून सैन्यासमागमे येत आहे. " असें पित्यास सांगितले. तेथें आल्यावर त्यास कादंबरीच्या विरहामुळे करमेनासे झाले व तिजकबील वर्तमान ऐकण्याविषयीं तो अगदीं वाट पहात बसला.