पान:बाणभट्ट.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४९ ) 147 JAN 1994 ऋषिजन दिसत होते. कांहीं शिष्य समिधा, फुलें व दर्भ घेऊन येत होते. कोणी वेदशास्त्रांचे पाठ झणत होते. होमहवनांच्या धुराचे लोट आकाशांत चालले होते. आश्रमाजवळ खच्छ उदकात्रीं सरोवरें होतीं. त्यांत अनेक कमलें प्रफुल्लित झाल्यामुळे त्या ठिकाणी ग्रह व नक्षत्रें स्नान करण्याकरितां- च आली आहेत काय अर्से भासत होतें ! आश्रमापुढें तृणधान्यें वाळत होती. वेदशास्त्रांचे पाठ ऐकून राघु च सारिका तसेच शब्द उच्चारीत होते ! हरिणी निर्भयपणानें मुनिबालकांस चाटीत होत्या ! त्या आश्रमाच्या मध्यभागी अशोकवृक्ष होता. त्याच्या खाली जावालि नांवाचे महर्षि बसले होते. त्यांच्या मस्तकावर शुभ्र व लांब लांब जटा लोंबत होत्या. खांद्यावरं शुभ्र यज्ञोपवीत होतें, उजव्या हातांत स्वच्छ स्फटिकमण्यांची माळ फिरत होती. अशा महर्षीला पाहून हें स्थान धन्य आहे असे मला वाटलें ! त्या ऋषीच्या सामर्थ्याने तें अरण्य अगदी निर्वैर- से दिसत होतें ! हारीतऋषीनें मला ह्याच अशोक वृक्षाच्या छायेंत एका बाजूस आणून ठेवलें व तो आपल्या पित्याजवळ दर्भासनावर बसला. कोठून आणला? " असे सर्व ऋषींनी विचारल्यावर त्याने सांगितले. मग जावालि मजकडे पाहून हा आपल्या दुर्वर्तनाचें फळ भोगीत आहे ! " अर्से म्हणाले ! तें ऐकून सर्व ऋषि उत्कंठित होऊन म्हणाले " भगवन्, अर्से यानें पूर्वजन्मीं काय केलें ! व हा कोण होता ! है ऐकण्याची आह्मांला फार उत्कंठा वाटत आहे, याकरितां कृपा करून सांगावें.” ते म्हणाले " आतां स्नानाची वेळ झाली आहे. याकरितां सर्व कर्मे आटोप- ल्यावर मग मी याचें चरित्र सांगेन " असें ह्मणून सर्व मंडळीसह जावालि उठले. पुढे सायंसंध्यादि कर्मे आटोपल्यावर हारीतऋषि मला घेऊन ज्या ठिकाणी आपला पिता बसला होता त्या ठिकाणी गेला. सर्व ऋषिहि त्या ठिकाणी येऊन बसले. त्यावेळी जिकडे तिकडे स्वच्छ चंद्रिका पडल्यामुळे ते स्थान फारच रमणीय दिसत होते! मग सर्वांची उत्कंठा पाहून जावालि- ऋपनी माझें पूर्ववृत्त सांगण्यास आरंभ केला. ! ते ह्मणाले, " अवंतीदेशांत उज्जयिनी नांवाची एक अत्युत्तम नगरी आहे. भगवान् महाकाल शंकर याचें तेथें स्वयंभू स्थान आहे. तेथील हा शुकबालक त्यांस वर्तमान