पान:बाणभट्ट.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११६ ) आपल्या पिलांस खाऊं घालीत आणि रात्र झाली की, त्यांस आपल्या पंखांनीं झाकून सुखानें काळ घालवीत. त्याच वृक्षावर माझी वृद्ध मातापितरें राहत असत. त्यांस मी फारा दिवसांनीं मुलगा झालों. माझ्या जन्मकाळी माझी माता प्रसववेदनेनें पीडित होऊन परलोकास गेली. तेव्हां माझा पिता सर्व दुःख गिळून फारच काळ जानें माझे लालनपालन करी. जरेमुळे माझ्या बापास चांगलें उडतां येत नसे. त्यामुळे दुसन्या पक्ष्यांचे घरट्यांतून खाली पडलेले धान्याचे व फळाचे तुकडे वेंचून आणून तो मला खावयास देई व त्यांतून जें उरे त्यानें तो आपलें उपजीवन करी. एके दिवशीं पहाटेस आकाश तांबर्डे झाले होते. चंद्र निस्तेज होऊन क्षितिजाखालीं चालला होता. पुढे पुढें आकाश स्वच्छ होऊन त्यांतील नक्षत्रे- हि क्रमाक्रमानें दिसतनाशीं होत गेलीं. पशु व पक्षी हे इकडे तिकडे हिंडूं फिरूं लागले. वृक्षांवरील पुष्पे गळू लागल्यामुळे ते सूर्यास पुष्पांजलिच अर्पण करीत आहेत काय असे दिसूं लागले ! मुनिजन स्नानसंध्या करून होमहवन करूं लागल्यामुळे धुरांचे लोट आकाशांत जाऊं लागले. मंद व शीतल असा वारा वाहू लागला. भ्रमर गुंजारव करीत फिरूं लागले. पंपासरोवरांतील पक्ष्यांचे शब्द सुरू झाले. सूर्योदय होऊन चांगला प्रकाश पडला. तेव्हां त्या वृक्षावरील राघू भक्ष्य मिळविण्याकरितां उडून गेले. त्यांची पिलें आपापल्या घरट्यांत दबून बसल्यामुळे तो वृक्ष शून्य भासूं लागला. मी व माझा बाप आपल्या घरट्यांत बसलो होतो. मला नुकतेच पंख फुटूं लागले होते, त्या- मुळे उडण्याचे सामर्थ्य आले नव्हते ! अशा वेळी एकाएकी मोठा गलबला ऐकू आला. वनांतील सर्व प्राणी घाबरून आपापले शब्द करीत धावत पळत सुटले. इतक्यांत मृगया करण्या करितां आलेले भिल्ल पशुपक्ष्यांचा संहार करीत येत आहेत असें दिसलें. त्यांच्या बरोबरच्या शिकारी कुत्र्यांनी कोणाचे कान, कोणाचे पाय, इत्यादि अवयव तोडल्यामुळे घाबरलेली हरणें दीन स्वरानें हिकडून तिकडे धावत पळत सुटली. त्यावेळी पशुपक्ष्यांच्या शब्दांनीं तें ठिकाण अगदी गज- बजून गेलें ! पुढें कांहीं वेळाने ती गडबड कमी झाली. तेव्हां बाहेर डोकावून पहावें म्हणून मी बापाच्या पंखांतून निघून घाबन्या घाबन्याने पाहूं लागलों तों, यम-