पान:बाणभट्ट.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंवार, करून घौत वस्त्रें धारण केली. नंतर संध्या, तर्पण व देवपूजा करून त्यानें होमशाळेत जाऊन होम केला. मग केशरी गंध लावून अंगावर भूषण घातली व नंतर शालजोडी पांघरून तो राजपुत्रांबरोबर भोजन करण्यास गेला. भोजन झाल्यावर तो दिवाणखान्यांत गेला. तेथें तांबूल घेऊन हस्ति दंती पलंगावर सुंदर बिछाना घातला होता त्यावर जाऊन बसला. राजाला राघूचें कौतुक वाटल्यामुळे त्यानें त्यास तेथें आणण्यास सांगितलें त्याप्रमाणें त्यास तेथें आणल्यावर राजा ह्मणाला, तुला आवडतात ते पदार्थ खावयास मिळाले का ? " तो ह्मणाला, " महाराज ! आपले येथें काय कमी आहे ? मला राणीसाहेबांनी पुष्कळ पदार्थ खावयास दिले. ते सर्व मला अमृतासारखे लागले. " मग राजा ह्मणाला, आह्मांस तुझें सर्व वर्तमान ऐक- ण्याची फार उत्कंठा वाटत आहे. याकरितां तें सांग. मग तो राघू ह्मणाला, महाराज, माझे वृत्त फार मोठें आहे, तथापि आपणास जर कौतुक वाटत आहे तर तें सांगतों ऐकावें. - - "या पृथ्वीत अतिविस्तीर्ण असे विध्यारण्य आहे. त्यांत झाडाझुडपांची अतिशय दाटी आहे व मधून मधून फलझाडे, फुलझाडें व वेली यांची फारच गर्दी आहे. कंदमूलफळे भक्षण करण्याकरितां अनेक पशुपक्ष्यांचे समुदाय त्या ठिकाणीं दृष्टीस पडतात. त्याच विध्यारण्यांत दंडकारण्य नांवाचा एक भाग आहे. त्यांत अगस्तिऋषीचा आश्रम आहे. भगवान् रामचंद्र हे पूर्वी त्या ठिकाणी राहिले होते. त्या अश्रमाजवळ पंपानावाचें सरोवर आहे. त्यांत अनेक प्रकारची कमले प्रफुल्लित असतात व त्यांवर भ्रमरांचे थवे गुंजारव करीत फिरतात. हंसपक्षी पुष्परस प्राशन करून उन्मत्त होऊन शब्द करीत हिंडतात. सरोवरावरून जलतुषार व सुगंध घेऊन मंदमंद वारा वाहत असतो. सरोवराच्या कांठी ऋषिजन स्नानसंध्या करीत बसतात. त्या सरोवराजवळ एक शिशिपावृक्ष आहे. तो वृक्ष फार मोठा असल्या- मुळे त्याच्या संधीत व भेगांत निर्भय जागा समजून, अनेक प्रदेशांतून हजारों राघू येऊन राहत असत. तो वृक्ष जुनाट असल्यामुळे त्यास थोडीं पानें होतीं, तथापि त्यांवर राघू बसत असल्यामुळे हिरव्या पानांनीं तो गच्च भरलाच आहे काय असा दिसत असे ! ते राघू रात्रीं आपल्या घरट्यांत राहून दिवसां भक्ष्य मिळण्याकरितां बाहेर जात असत व भक्ष्य आणून १९