पान:बाणभट्ट.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३६ ) कुंतलक नांवाचा सेवक त्याचे दृष्टीस पडला. त्यास विचारल्यावर फार शोक करून त्यानें सांगितलें कीं, “ राज्यवर्धनानें मालवराजास तेव्हांच जिंकिलें; परंतु गौडराजानें कपटानें अगत्य दाखवून राज्यवर्धनास आपले घरी नेलें व विश्वासघातानें कत्तल करून मारलें ! " याप्रमाणे समजतांच हर्षाचें दुःख काय विचारावें ! क्रोधानें त्याच्या अंगाची फारच आग झाली. तो ह्मणाला, काय दुष्टानें घात केला पहा ! असा दुष्ट कोणत्या योनीत किंवा नरकांत जाईल तो जावो ! पुढें आपला परिणाम कसा होईल हें त्या दुष्टानें मनांत आणिलें नाहीं आं ! तो अधम माझ्यापुढे कोठें जाणार आहे !" याप्रमाणे हर्ष आपल्याशी बोलत आहे तो सिंहनादनामक सेनापतीनें जवळ येऊन विनंति केली की, " महाराज, झाली गोष्ट ती फारच वाईट झाली हें खरें ! परंतु तिला आतां उपाय काय ? दुष्ट गौडराजाची ती किती बिशाद ! त्याचा उच्छेद करण्यास काय उशीर आहे? हल्लीं आपल्या कुळावर काळ कोपला आहे एवढे मात्र खरें ! याकरितां धैर्य धरावें. सर्व लोक घाबरून गेले आहेत त्यांस धैर्य द्यावें. नंतर अधम गौडाच्या नाशाविषयीं व पृथ्वी जिंकण्याविषयीं प्रतिज्ञा करून हातांत शस्त्र धारण करावें. शत्रूच्या रक्तप्राशनावांचून भीमा- ची जशी शांति झाली नाहीं, क्षत्रियरक्तांत स्नान केल्याखेरीज परशुरामाचें जसे समाधान झालें नाहीं, त्याप्रमाणेंच शत्रूचें रक्तचंदन अंगास लागल्याशिवाय आपलाहि दाह शांत होणार नाहीं! " असें बोलून तो उगीच राहिला. हर्ष ह्मणाला, " तूं ह्मणतोस त्याप्रमाणे झाल्याखेरीज शांति होणार नाही खरींच! आतां क्रोधामुळे माझ्या अंतःकरणांत शोकालाहि अवकाश राहिला नाहीं. तर मी आतां अशी प्रतिज्ञा करितों कीं, अल्पकाळांतच गौडविरहित पृथ्वी करणार नाहीं तर प्रज्वलित अग्नीत पतंगाप्रमाणे मी उडी टाकीन !" मग दिग्विजय करण्याचा निश्चय करून सर्व राजांनां करभार देण्याविषयी किंवा युद्धास तयार असण्याविषयी पत्र लिहिण्यास आज्ञा केली. नंतर तो उठून आपले मंदिरांत गेला. प्रियबंधूच्या दुःखाने रात्रीं त्यास झोप आली नाहीं. प्रातःकाल होतांच हस्तिसैन्याचा अधिपति स्कंदगुप्त यास लवकर घेऊन ये. ण्यास सेवकास आज्ञा केली. त्याप्रमाणे तो आल्यावर हर्ष त्यास ह्मणाला, “ प्रियवंधूचें वर्तमान व पुढे माझे कर्तव्य है तुझ्या ऐकण्यांत आले असे- याकरितां हस्तिसैन्य लवकर सज्ज करून आणावें. " तो म्हणाला, स्वामीची आज्ञा मला मान्य आहे व आपले कर्तव्यहि योग्यच आहे. परंतु लच;