पान:बाणभट्ट.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

22 SEP 1996. ( १३५ ) येथें तीस बंदिशाळेत टाकलें ! या आपल्या देशावर स्वारी करण्याचाहि त्याचा विचार आहे ! " , जसा हे ऐकतांच राज्यवर्धनास ती गोष्ट सहन झाली नाहीं व असा आपला कधीच अपमान झाला नाही ह्मणून त्यास फार राग आला व त्याच्या अंगांत शौर्याचा आवेश चढून त्याने पुनः हातांत खड्ग घेतला ! मग तो आपल्या प्रियबंधूस ह्मणाला, “ हर्षा ! आपलें कुल, आप्तमित्र व सेवक या सर्वीस तूं संभाळ. दुष्ट मालवराजाचा नाश करण्याकरितां मी हा असाच निघालो. दुष्टांचा समूळ उच्छेद करणे हीच माझी आतां तपश्चर्या ! हरणाने सिंहाचा आयाळ धरून पराभव करावा, किंवा वासरानें वाघास कोंडावें किंवा बेडकानें सापाच्या तोंडांत मारावी ! याप्रमाणे हा पुष्पभूतिवंशाचा अपमान झाला ! तर आतां सर्व मांडलिक राजे व सैन्य तुजजवळच असूं दे. एकटा भंडी मात्र दहा हजार घोडेस्वारांसह मजबरोबर आला म्हणजे झालें. " असे बोलून त्यानें प्रयाणवाद्ये वाजविण्यास सांगितलें. त्या- वेळी हर्ष अत्यंत दुःखित होऊन आपले भावास ह्मणालाः " मी बरोबर आलों म्हणून काय चिंता आहे ? मी लहान आहे असे आपणांस वाटत असेल तर माझे संरक्षण होण्यास मी आपले जवळच पाहिजे ! घरीं सुखांत राहा, असे आपले झणणे असेल तर तें सुख आपले बरोबरच जात आहे ! दोघांचें काय कारण आहे ? असे आपण ह्मणाल तर मलाच एकट्या ला आज्ञा करावी ! " ह्याप्रमाणे भांवाचें भाषण ऐकून राज्यवर्धन ह्मणाला, हर्षा, या प्रसंगी तुला पाठवून मीं घरीं राहणे योग्य नाहीं. हरणाला मारणें सिंहाला कांहीं कठिण आहे काय ! तूं आतां घरीं राहून सर्व राज्याचें रक्षण कर. मला या दुष्टाच्या नरडीचा घोट घेऊं दे पराक्रमाचे प्रसंग पुढें पुष्कळ आहेत. कुलपर्वताला देखील हालविणाऱ्या वान्याला कापूस उडविणे कठिण आहे काय? पुढें दिग्विजयाच्या वेळेस तूं पराक्रम करून दाखीव, परंतु आतां मला जाऊं दे ! " असें ह्मणून तो तत्काळ निघून गेला. वडील बंधू गेल्यावर हर्षास फारच अवघड वाटले. त्यास वाईट स्वप्ने पडू लागली त्यामुळे त्याच्या मनांत अनेक शंका उभ्या राहिल्या. ' प्रियबंधूचें कल्याण असो, ' असें तो चिंतूं लागला. एके दिवशीं प्रातःकाळीं नित्याप्रमाणें स्नानादिकृत्यें आटोपल्यावर हर्ष सभास्थानीं येऊन बसला असतां खिन्न मुद्रेनें अश्रु ढाळीत राज्यवर्धनाचा