पान:बाणभट्ट.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११२ ) मालतीमाधवनाटकांत बौद्धजतीण कामंदकी व वैदिकधर्मी देवरात व भूरिवसु यांचा व तिचा फार स्नेह होता. ते एका गुरूजवळ विद्याभ्यास करीत होते व ते एकमेकांचे हित साधण्याकरितां झटत होते अशाबद्दल स्पष्ट वर्णन आहे. या शतकांत त्यावेळी शैवपथ व मंत्र, तंत्र, वशीकरण इत्यादिकांचा प्रचारहि फार होता, असें हर्षचरितांतील भैरवाचार्य, कादं- वरीतील वृद्धद्रविड व मालतीमाधवांतील अघोरघंट यांच्या वर्तनावरून ध्यानांत येते. तसेच बाणाच्या दोन्ही ग्रंथांतील बौद्धांच्या संबंधानें वर दिलेल्या प्रमाणांत शैवादिक पंथांचे जागजागीं उल्लेख आहेतच. दिवाकर मित्रानें बौद्धदीक्षा घेऊन एकांती अरण्यवास स्वीकारला होता यावरून, व हर्षाची विधवाबहीण ही वैतागानें बौद्धदीक्षा घेण्यास सिद्ध झाली होती व बन्याच स्त्रिया हीच दीक्षा घेतलेल्या होत्या. यांवरून हा पंथ निवृत्तिमार्गास अनुकूल असल्याबद्दल त्या कालीं पुष्कळांची खाली झाली होती, असे लक्षांत येतें. त्या कालीं ब्राह्मणविद्वान्कवि देखील आपल्या ग्रंथांत बौद्ध धर्मीतील तत्त्वांच्याच उपमा वगैरे देत असत. बाणानेंच ' मुगत इव शांतमनसि आणखी 'जिनधर्मेणेव जीवानुकंपिना ' अशा दोन्ही ग्रंथांत जागजागीं उपमा वगैरे दिलेल्या आहेत | इत्यादि अनेक गोष्टींवरून त्या काली बौद्धधर्म किती दृढमूल झाला होता है कोणा- च्याहि लक्षांत येण्यासारखें आहे. . या वर्णनावरून दुसरे असे लक्षांत येतें कीं, वाण हा वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणग्रंथकार असून त्याच्या अंतःकरणांत बौद्धधर्माचा द्वेष कोठेंहि दिसून येत नाहीं. स्वधर्माचाच पक्षपात त्याच्या मनांत असता तर त्याने बौद्धांची महती व वर्णनें आपल्या ग्रंथांत घातली नसती; परंतु तसे कोठें दिसत नाहीं. हुएनसँग हा वाणासारखा निःपक्षपाती दिसत नाहीं. तो स्व (बौद्ध) धर्माची महती गाणारा व ब्राह्मणादि वैदिकधर्मी लोकांस ( heretic ) ह्मणून त्यांची जागजागी निंदा करणारा दिसतो. तसाच तो धर्मभोळाहि दिसतो. त्यामुळे बौद्धधर्मसंबंधीं अद्भुत गोष्टींबद्दल विचार न करितां त्या सर्व खण्याच समजतो. हर्ष वोधिसत्वाकडे गेल्यावर त्याचें दर्शन व त्याजबरोबर सं भाषण वगैरे अद्भुत गोष्टी त्याच्या पुस्तकांत आहेत व त्या खन्या आहेत असें तो समजतो. बाणाच्या व त्याच्या वर्णनांत बरेच फरकहि दिसतात.