पान:बाणभट्ट.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

CR ) 111 JAN 1994

', बौद्धधर्म स्वीकारल्याबद्दल हर्षचरितांत वगैरे आधार आहेतच. बौद्धधर्म हा एकसोरखा फार दिवस चालत आल्यामुळे तो वैदिकधर्मीत अगदी मिसळून गेला होता. दोहींचा अगदी एकजीवच झाला होता असें झटलें तरी चालेल. हर्षराजा हा बाण, मयूर इत्यादि ब्राह्मण विद्वानांचा जसा सम्मान करीत होता, त्याप्रमाणे त्याने बौद्धधर्मी दिवाकरमित्र व हुएनसँग वगैरेंचाहि सन्मान केलेला आहे. बाण जेव्हां हर्षाच्या भेटीस गेला तेव्हां तेथें हर्षा- सभोंवतीं अनेकधर्मपंथांचे लोक होते त्यांत बौद्धहि होतेच. " जैनेराहतैः पाशुपतैः पाराशरिभिर्वर्णिभिश्च x x उपास्यमानम् । " असें हर्षाचे वर्णनांत आहे. बौद्धयति दिवाकरमित्र याच्या वर्णनांतहि " वीतरागैरा हेतैर्मस्कारीभिः x x औपनिषदै: पौराणिकै धर्मशास्त्रभिः x x , इत्यादिकानीं युक्त असें आहेच. हर्षानें आपल्या आदित्यभक्तपित्याप्रमाणं सौगतबंधूसहि पुण्यप्राप्ति होण्याकरितां ब्राह्मणांस दान दिल्याबद्दल ताम्र- पटांत आहेच. खुद्द बाणाच्या बरोबर असलेल्या मित्रमंडळींत देखील वीर- देव नांवाचा बौद्ध भिक्षु होताच. बाणाच्या कल्पनासृष्टीतल्या कादंबरींत चंद्रापीडाच्या आईच्या वर्णनांतहि " कापायरक्तांवरधारिणीभिर्जर- त्मत्रजिताभिर्विनोद्यमानां " असें आहेच. ब्राह्मण ह्मणून वर्णिलेल्या शुकनास प्रधानाच्या वर्णनांतहि " शाक्यमुनिशासनपथधौरेयै रक्तपटै: पाशुपतैर्द्विजैश्च दिवानिशमासेव्यमानम् ।” यांतहि बौद्धादिक व ब्राह्मण हे ब्राह्मण शुकनासप्रधानाच्या सभेत एके ठिकाण असल्याचें वर्णन आहेच. कल्पिलेली नायिका कादंबरी इच्या वर्णनांतहि " ददर्शच + + + + + + पठंतीभिर्भगवतस्त्र्यंबकस्यांविकायाः कार्तिकेयस्य विष्टर- श्रवसो जिनस्यार्यावलोकितेश्वरस्याईतो विरिंचस्य पुण्या: स्तुतीरु- पास्यमानाम् " इत्यादि [का० २०८-२०९ ] असें आहे. कादंबरीच्या जवळहि बौद्धजोगिणी वगैरे असल्याचे वर्णन आहेच. फार काय कल्पिलेल्या कादंबरींत देखील तत्कालीन बौद्ध संघट्टनामुळेच की काय बाणाच्याकडून बौद्धांच्या संबंधाचे वर्णन आल्याखेरीज राहिले नाहीं ! 66 66 . एकंदरीत सातव्या शतकांत तरी वैदिक व बौद्ध इत्यादि पंथांतल्या लोकांत विरोध असल्याचें वाणाच्या वर्णनावरून तरी दिसत नाहीं. याच शतकांतील भवभूतीच्या वर्णनांतहि हाच प्रकार आढळून येतो.