पान:बाणभट्ट.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०९ ) ह्या इतक्या कालाच्या अवधीत राज्यश्रीहि नृत्यगीतादि कला शिकून त्यांत प्रवीण झाली व पुढें ती तारुण्यावस्थेत आली असल्याचें वर्णन आहे. तेव्हां पुष्कळ राजांकडून तिला मागण्या आल्या, तथापि मनाजोगता वर न मिळाल्यामुळे प्रभाकर हा चिंताग्रस्त राहिला. पुढे त्यानें मौखरीवशांतील गृहवर्मा हा वर निश्चित केल्याचें व विवाहविधीने त्यास आपली तरुण कन्या दिल्याचें आणि विवाहानंतर तो कांही दिवसांनीं आपल्या तरुण स्त्री- सह स्वराजधानीस गेल्याचें वर्णन आहे. १ स्त्री वयांत येण्यास त्यावेळी निदान सोळा सतरा वर्षीचें वय तरी असले पाहिजे. हल्लीच्या काळची गोष्ट निराळी ! हल्लीं तेराव्या चवदाव्या वर्षीहि स्त्रियांना आईपण येतें ! हल्लींसारखी स्थिति शे दोनशे वर्षांपूर्वी देखील नव्हती, असे वृद्ध वृद्ध मनुष्यांच्या सांगण्यांत येतें. मग राज्यश्रीचा काळ ह्मणजे तेराशें चवदार्शे वर्षांपूर्वीची गोष्ट होय. प्राचीनकाली तर मनुष्याचें तारुण्य व आयुष्य हीं फारच पुढे जात होतीं असे इतिहास सांगत आहे. तेव्हां राज्यश्रोचें वय तारुण्यावस्थेत १६ वर्षीचें घरलं तरी हर्षाचें निदान १८ वर्षाचें व राज्यवर्धनाचें २३ वर्षीचें असले पाहिजे. 66 पुढे प्रभाकराने राज्यवर्धन हा " कवचहर " कवच धारण करण्या- सारखा-पराक्रम करण्यासारखा पूर्ण वयांत आलेला ह्मणजे सुमारें २३ २४ वर्षीचा झालेला पाहून त्याला हूणांवर पाठविले. तेव्हां हर्ष आपल्या भावा- बरोबर हिमालयापर्यंत गेला व तेथेंच तो मृगया करीत कांहीं काळ राहिला असतां त्याचा बाप विषमज्वरानें अत्यवस्थ असल्याचें त्याला पत्र आल्यावरून तो मोठ्या तातडीनें उपाशी परत स्थानेश्वरास गेला. राजवाड्यांत गेल्यावर हर्षानें सर्व वैद्य एकत्र जमवून त्यांनां पित्याच्या प्रकृतीबद्दल विचा रिलें असतां त्यांनी त्यास धैर्य धारण करण्यास सांगितलें. ह्या वैद्यलोकांत पित्यानें पुत्राप्रमाणे मानलेला बंधूसमान वैद्यशास्त्रपारंगत अश्रु ढाळणारा रसायन नांवाचा तरुण वैद्यकुमार होता, त्यास हर्षानें विचारिलें, " सखे रसायन कथय तथ्यं यद्यसाध्विव पश्यसि " हा रसायन वैद्यकुमार हृदयन, दक्षिणेनच हस्तेन माधवगुप्तमंसे, विरलैरेव राजभिरनुगम्यमानश्वरणाभ्यामेव प्रावर्तत गंतुम् । ,

  1. तेषां तु भिषजां मध्ये युवाष्टादशवर्षदेशीयस्तस्मिन्नेव राजकुले कुलक्रमागतो गतः

पारमष्टांगस्यायुर्वेदस्य भूभुजा सुतनिर्विशेषं लालितः प्रकृत्यैवातिपटीयस्या प्रज्ञया यथा-