पान:बाणभट्ट.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०८) भावाने आपला मुलगा भंडी यास राज्यवर्धन व हर्ष यांच्या सहवासास आणून ठेवलें. तेव्हां तो आठ वर्षीपेक्षां थोडा कमी (अष्टवर्षदेशीयम्) होता. गर्भधारणापासून प्रसूतिकाल नऊ महिन्यांचा असल्याबद्दल प्रसिद्धच आहे. तेव्हां राज्यश्रीच्या जन्मकालीं राज्यवर्धनाचेंहि वय ७ वर्षांचें असावें, व हर्षाचें दोन वर्षीचें तरी असावें. यावरून राज्यवर्धन व भंडी हे जवळ जवळ सारख्या वयाचे होते अर्से लक्षांत येतें. पुढे राज्यवर्धन व हर्ष हे दोघेहि तारुण्यांत आल्याचें व त्यामुळे त्यांच्या मांडया, भुज व छाती इत्यादि अवयव चांगले भरल्याचें वर्णन आहे. त्यावेळी राज्यवर्धन सुमारें २१ वर्षांच्या वयाचा असावा व हर्षहि बांणानेंच वर्णिलेल्या तारुण्या- च्या आरंभकालाप्रमाणें निदान १६ | १७ वर्षांचा असावा. यापेक्षा कमी वयास तारुण्य कसें ह्मणतां येईल ? प्रतापवर्धनाने त्याचवेळी मालवराजाचे दोन पुत्र कुमार व माधव हे सर्व प्रकारें कसोटीस उतरल्यामुळे आपल्या मुलांची खबरदारी घेण्याकरितां त्यांस त्यांच्या स्वाधीन केले. यांपैकी वडील भाऊ कुमार- गुप्त_हा ह्यावेळी १८वर्षीचा व माधवगुप्त हा सुमारें हर्षाच्या बरोबरीचा ह्मणजे सुमारें १६ १७ वर्षांचा असावा. हे दोघे बरोबरीचे होते ह्मणूनच हर्ष जेव्हां पुढें घोड्यावरून उतरून दिवाकरमित्राकडे मर्यादेनें पाय चालत गेला, त्यावेळेस माधवेंगुप्ताच्या खांद्यावर उजवा हात टाकून गेला असल्या- चे वर्णन आहे ! काकपक्षशिखंडकं खंडपरशुहुंकाराग्निधूंमलेखानुबद्धमूर्धानं मकरध्वजमिव पुनर्जातं एकेंद्रनीलकुंडलांशुश्यामलितेन शरीरार्धेनेतरेणचत्रिकंटकमुक्ताफलालोकधवलितेन संपृक्तावतारभिव हरिहरयोदर्शयंतं, पीनप्रकोष्ठप्रतिष्ठितपुष्पलोहवलयं, परशुराममिव क्षत्रक्षपणक्षीणपरशुपाशचिन्हितं बालतां गतं कंठसूत्रग्रथितभंगुरप्रवालांकुरं हिरण्यकशिपु मिवोरः काठिण्यखंडितनरसिंहनखरखंडं गृहीतजन्मांतरं शैशवेऽपि सावष्टंभ बीजमिव वीर्यद्रुमस्य, भंडिनामानमनुचरं कुमारयोरर्पितवान् । १ वाणानें कादंबरीत तारुण्याचा आरंभ १६ व्या वर्षांच वर्णिला आहे.- एवंच क्रमेण समारूढयौवनारंभं + अधीताशेषविद्यं चावगम्यानुमोदितमाचार्यै- चंद्रापीडमानेतुं राजा बलाधिकृतं बलाहकमाहूय बहुतुरगबलपदातिपरिवृतमति- प्रशस्तेहनि प्राहिणोत । " अयमत्रभवतो दशमो वत्सरो विद्याग्रहमधिवसतः । प्रविष्टोसि षष्ठमनुभवन्व- र्पम् । एवं सर्पिडितेनामुना पोडशेन प्रवर्धसे " २ अस्मिन्नेव प्रदेशे स्थापयित्वा वाजिसेनामवलंब्यच तपस्विजनदर्शनोचितं विनयं