पान:बाणभट्ट.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०५ ) हूणांबरोबर युद्ध करण्याकरितां गेला होता. त्या वेळी पाठीमागें हर्षास राज्यासनावर बसविण्याच्या खटपटी चालू होत्या; परंतु राज्यवर्धन विजयी होऊन परत आल्यामुळे त्या सर्व फसल्या व इ. स. ६०५ त तो गादीवर बसला, अर्से व्हिन्सेंट स्मिथ याच्या लेखांत आहे. स्मिथनें हें तरी हुएन- सँगच्या वगैरे आधारानेंच लिहिले असावें. आतां हर्षचरितांवरून पाहतां हूणोंस जिंकून राज्यवर्धन परत घरीं आला तेव्हां त्याला लढाईत बाणा- च्या जखमा लागल्या होत्या व त्यांवर पट्या बांधलेल्या होत्या. त्यामुळें जवळ येऊन पोहोंचलेल्या राज्यलक्ष्मीच्या कटाक्षांनींच त्याचें शरीर व्याप्त झाले आहे काय ! अशी बाणकवीनें त्यावर उत्प्रेक्षा केलेली आहे. बापाच्या पश्चात् राज्यासनावर बसण्याचा वडील मुलाचा हक्क खराच, परंतु तो परत आल्यावर राज्यासनावर बसण्यास त्याला मुदलींच सवड मिळाली नाहीं. यामुळे स्मिथचे इतिहासांतील मजकुराचा हर्षचरितांतील मजकुराशीं मुद- लींच मेळ जमत नाहीं. बाणाच्या वर्णनावरून अर्से सूचित होतें कीं राज्य- लक्ष्मीनें तो हक्कदार असल्यामुळे त्याजकडे कटाक्ष फेकले-ह्मणजे तो हक्क- दार असल्याचें दाखविलें, इतकेंच, व तें युक्तच आहे. यावरून इतकेंच अनुमान करितां येईल कीं. प्रतापवर्धन वारल्यावर राज्यवर्धन मोहिमेवर who १“Rajyavardhan while thus pleasantly employed, Harsha, was then a lad fifteen years of age, received news that his father lay dangerously ill with a violent fever. He returned to the capital with all speed, where he found the King in a hopeless condition. The disease quickly ran its course, and all was over long before the elder son, who had been victorious in his campaign,could return to claim his birthright. There are indications that a party at court inclined to favour the succession of the younger prince; but all intrigues were frustrated by the return of Rajyavar- dhan, who ascended the throne in due course. He had hardly seated himself when newes arrived which compelled him again to take the field. 79 Early history of India by V. A. Smith chapter VIII P.283. २ ' हूणनिजयसमरशरव्रणवद्धपकैदीर्घधवलैः समासन्नराज्यलक्ष्मीकटाक्षपातैरिव शबलीकृतकायम् ' | ह. च. १९६. १४ .