पान:बाणभट्ट.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०४ ) , भरवून हर्षानें राज्यसूलें आपल्या हाती घ्यावीं ह्मणून लोकांस संबोधून भाषण केलें आहे; व राज्याधिकार स्वीकारण्याविषयीं हर्षाची प्रार्थना केली आहे. तसेंच हर्ष हा बोधिसत्वाची प्रार्थना करून राज्य चालवूं लागला आहे व नंतर तो शत्रूचा नाश करण्याकरितां निघाला असल्याचे वर्णन आहे. आतां अशा प्रकारचा वृत्तांत हर्षचरितांत जरी नाहीं, तरी भंडी हा प्रधानासारखा असणे हे अगदीच असंभाव्य आहे असें नाहीं. कारण, तो हर्षाचा मामे- भाऊच होता. प्रभाकरानें यास लहानपणापासून आपल्या दोघां मुलांप्रमाणेच मानिलें होतें, व तो सैन्य घेऊन युद्धास वगैरेहि जात असेच. हर्षाचा भाऊ राज्यवर्धन हा शत्रूवर चालून गेला, तेव्हां त्यानें दहाहजार घोडेस्वारांनिशीं भंडीस आपल्या कुमकेस नेलें होतें. पुढे आपल्या बंधूचा घात झाल्याचे समज- ल्यावर हर्ष जेव्हां शत्रुवर चालून गेला, तेव्हां त्याची व राज्यवर्धनाबरोबर गेलेल्या भंडीची वाटेनें गांठ पडली आहे त्या वेळी दोघांनी राज्यवर्धना- विषयीं शोक केला असल्याचें वर्णन हर्षचरितांत आहे. असा याठिकाणीं परस्परांत विरोध आढळतो. यामुळे हुएनसँगची माहिती बरोबर वाटत नाहीं. हर्ष हा आपला बंधु वारल्यावर राज्याधिकार स्वीकारण्याच्या वेळेस बुद्ध देवतेचे अनुमोदन घेण्याकरितां गेला होता, असें हुएनसँगच्या लेखांत आहे. परंतु हर्षचरितावरून पाहतां तो त्या वेळीं बौद्धधर्मी झाला नसून वैदिकधर्माचेच आचरण करणारा होता, कारण, तो शत्रूचा सूड उगवि- ण्याकरितां घरून निघाला तेव्हां शिवपूजन करून व ब्राह्मणांनां दानधर्म करून निघाला आहे. पुढे जेव्हां दिवाकर मित्राची व हर्षाची भेट झाली, तेव्हां त्याचे मनांत त्या धर्माचें बीजारोपण झाले असावें असे दिसते. या गोष्टींतहि परस्पर विरोध वाटतो. तथापि त्यावेळी वैदिक व बौद्ध धर्म यांचा अति निकट संबंध झाला असल्यामुळे अशी गोष्ट होणें केवळ असंभाव्य नाहीं. जसें मुसलमानी धर्माचें प्राबल्य झाल्यापासून आमचे लोक त्याच्या देवाचें दर्शन घेतात, त्यास नवस करितात व भजतात, त्याचप्रमाणें हेंहि झालें असावें असें मानण्यास कांहीं हरकत वाटत नाहीं. राज्यवर्धन हूणांवर गेला असतां मांगे हर्पाला राज्यावर वसविण्याच्या खटपटीविषयीं वाण, हुएनसँग व स्मिथ इत्यादिकांच्या वर्णनांत विरोध. हर्षाचा बाप वारला तेव्हां त्याचा थोरला मुलगा राज्यवर्धन उत्तरेकडील