पान:बाणभट्ट.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०२ ) ८ विष्णुवर्धन ' नांवाचा एक राजा होता. यास 'यादवकुलांबरघुमणि' असें झटलें आहे. तसेंच चालुक्य क्षत्रियघराण्यांत विष्णुवर्धने नांवाचे बरेच क्षत्रियराजे झालेले आहेत. असें ताम्रपट व शिलालेख यावरून समजतें. तेव्हां ' वर्धन ' हें क्षत्रियांस लावतात असे उघड झाले. यावरून पंडितांचें लिहिणें चुकीचें असावें. हर्षाच्या घराण्याचा थोर क्षत्रिय घराण्याशीं शरीर- संबंध घडल्याचे आधार सापडतात. यावरून व बाणाच्या एकंदर वर्णनाच्या झोकावरून हे वैश्यराजे असावे, असें ह्मणण्यास बरीच शंका वाटते. कारण ग्रहवर्मा हा थोर क्षत्रियघराण्यांतला असल्याबद्दल व त्याला हर्षाची बहीण दिली असल्याबद्दल वर्णन आहे. " प्रायेणच सत्स्वप्यन्येषु वरगुणेष्वभि जनमेवानुरुध्यन्ते धीमन्तः | धरणीधराणांच मूर्ध्नि स्थितो माहेश्वरः पादन्यास इव सकलभुवननमस्कृतो मौखरीवंशः " अशी वाणकवीने या राजघराण्याची थोरवी प्रभाकरवर्धनाच्या मुखाने वर्णिली आहे. बलभी- चा ध्रुवसेन हा हर्षाचा नातजावई होता व तो क्षत्रिय होता आणि यशोवर्मा हा (ग्रहवर्म्याचा वंशज) पुढें हर्षा नंतर कनोजच्या गादीवर बसला आहे, तो चंद्रवंशांतला राजा असल्याबद्दल वाक्पतिराजकवीनें गौडवधकाव्यांत वर्णन केले आहे.तसेंच ‘गोरोचनापिञ्जरितवपुषि समभिव्यज्यमानसहज क्षात्रतेजसीव ' हर्षाच्या अंगास गोरोचन लावल्यामुळे गौरतेजस्वीपणा दिसत होता, यामुळे हे त्याच्याबरोबर ( स्वतःसिद्ध ) क्षत्रियतेजच प्रकट झाले आहे काय ! अशी वाणानें उत्प्रेक्षा केली आहे ! यावरून तो क्षत्रिय असल्यामुळेच त्याच्या अंगावर स्वतःसिद्ध क्षत्रियतेज प्रकट झाले काय ! असे वाणाच्या वर्णनांत आले आहे. तसेच 'वॅर्म ' हे क्षत्रियासच लावतात. यासाठी आणखी कांहीं तसेच प्रमाण सापडल्याखेरीज हे वैश्य राजे होते १ लुईस राईस साहेबानें मैसूरकडील शिलालेख छापले आहेत ते पहा. २ प्राचीन लेखमाला भाग १ पहा. The present king ( Valabhi ) is of the Ksatriya cast as they all are. He is the nephew of Silàdiryaraja of_Malava and son-in-law of son of Siladitya the present King of Kanya-kubja. Hiuen Tsiang Vol II. P. 267. ४ शर्मवदब्राह्मणस्योक्तं वर्मेति क्षत्रसंयुतम् गुप्तदासात्मकं नाम प्रशस्तं वैश्यशूद्रयोः ॥ विष्णुपुराण.