पान:बाणभट्ट.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

MAY 2007 नं. पं. नम् " असें वर्णन केलें आहेच. त्यावरून बाणाची भेट झाली तेव्हां हर्षानें कांहीं शत्रु जिंकून ताव्यांत आणत होते, व आणखी बाकी राहिलेले शत्रु जिंकण्याचे कामहि चालू होतेच असे छूटले आहेर, आता प्रतिज्ञात कृत्यें शेवटास न्यावयाची ह्मणजे त्यांत मुख्य गोडवध च पृथ्वीतील उद्धट राजे जिंकर्णे, ह्रींच होत. असे हर्षचरित व हुएनसँगचा लेख यांवरून सहज लक्षांत येतें. तेव्हां हर्षानें आपले शत्रु जिंकिले असे मानण्यास तर कांहींच हरकत नाहीं. तथापि बाणाकडून पुढील गौडवधादिक पराक्रमाचें विशेष वर्णन तसेंच अपरिहार्यकारणामुळें राहून गेलें. हर्षाचें क्षत्रियत्व व राजधानी यांबद्दल विचार. यासंबंधानें बाण व हुएनसँग इत्यादिकांत विरोध. बाणभट्टानें हर्ष हा पृथु, नल, दिलीप, इत्यादि राजांसारख्या पुष्प- भूति - राजाच्या वंशांत उत्पन्न झाला असें ह्मटलें आहे व राजनूं, देव, पार्थिब, भूभृत्, नृप इत्यादि क्षत्रियवाचक शब्द त्यास व त्याचे पूर्वजांस लावलेले आहेत. तसेंच हर्षाचे आईस वाणानें 'महाभूभृतकुलोद्गता' असें विशेषण योजलें आहे. ह्या त्याच्या लेखावरून हे क्षत्रियराजे असल्याबद्दल कोणास शंका येण्याचे कारण नाहीं. तथापि हुएनसँग यानें यांस ' वैश्य ' असें घटलें आहे. परंतु तें तसे नसून 'बैस " असेच असावें असें वाटतें. क्षत्रिय रजपूत राजांत 'बैस ' ह्मणून एक जात असल्याबद्दल आधार आहे. त्या जातींपैकींच हे असल्यामुळे हुएनसँगर्ने यांस ' बैस ' ( वैश्य ) राजे असें झटले असावें. ‘वर्धन' हे वैश्यजातीस लावतात असे कै० शंकर पांडुरंग पंडित याचें ह्मणणे आहे, परंतु तें बराबर नाहीं. यादवराजांत "" ह०च. १ आमच्या एक दोन टीकाकारांनी या ठिकाणीं असे आक्षेप घेतले आहेत कीं, राजन् वगैरे शब्द क्षत्रियवाचक नसून ते पाहिजे त्या राजास लावतात. परंतु तसेंच केवल नाहीं. " एकविंशतिकृत्वः कृत्तवंशमुत्खातवान्राजन्यकं परशुरामः । उ० ६. परशुरामानें एकवीस वेळ निःक्षत्रिय पृथ्वी केली. महाभारतादिकांत हे शब्द क्षत्रियवाचक असल्याचे आढळतें. तथापि हे शब्द पाहिजे त्या राज्यकर्त्यास लाव- ण्याचाहि प्रघात चालू आहे, नाहीं असेंच नाहीं. २ रा० ब०० पां० पंडित यांच्या गौडवधकाव्याच्या प्रस्तावनेंत ' वर्धन ' हैं वैश्यास लावतात असे हाटले आहे. परंतु यास कांहीं प्रमाण नाहीं. हुएनसंगनें हाट- लेल्या ‘ बैस ' [ वैश्य ! ] वरून हें झटलेले असावें असे वाटतें.