पान:बाणभट्ट.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९८ ) या सर्व राजांचे कालनिर्देश, स्थलनिर्देश आणि विशेष नांवें हीं आपल्या ग्रंथांत दिली नाहीत त्यामुळे मोठा घोटाळा झाला आहे ! हा घोटाळा केवळ याच ठिकाणी झाला आहे असें नाहीं, तर आमच्या सर्व कवींच्या ग्रंथांत असाच किंवा यापेक्षांहि अधिक ब्रह्मघोटाळा दृष्टीस पडतो ! बाणकवीनें आपला व आपला आश्रयदाता हर्षराजा याचा बराच इतिहास तरी दिलेला आहे ! इतरांच्या ग्रंथांत तर एका नांवाखेरीज दुसरें कांहींच नसतें व तेंहि कधीं कधीं अज्ञानी लेखक लिहिण्याचे टाळतात ! राज्य- हर्षाची राजधानी, राज्यविस्तार व त्याचा मृत्युकाल. हर्षाची राजधानी प्रथम स्थानेश्वर व नंतर कनोज ही होती. वर्धनानें मालवराजास मारल्यानंतर हर्षानें त्याचें माळव्यातील राज्य खालसा केले असावें. पुढे त्यानें प्रसिद्ध क्षेत्र उज्जयिनी येथेहि राजधानीच ठिकाण केल्याचें लक्षांत येतें. मयूरशतकाच्या मधुसूदनकृत भावबोधिनी टीकेंत " मालवराजस्योज्जयिनी राजधानीकस्य कविजनमूर्धन्यस्य रत्नावल्याख्यनाटिकाकर्तुर्महाराजश्रीहर्षस्य " असे आहे. यावरून उज्जयिनी हैहि त्याच्या राजधानीचे ठिकाण होत असे लक्षांत येतं. 9 हर्ष राजाच्या राज्याचा विस्तार- उत्तरेस हिमालयापर्यंत, दक्षिणेस नर्मदेपर्यंत, पश्चिमेस पंजाबपर्यंत व पूर्वेस बंगालपर्यंत होता. हर्षानें सुमारे ४० वर्षे राज्य केलं व तो. ई. स. ६४८ - ५० या कालावधीत वारला. हर्ष हा शककर्ता राजा झाला. त्याचा शक कांहीं कालपर्यंत उत्तरहिंदुस्थानांत चालू होता याबद्दल शिलालेखांत पुरावा मिळतो. हर्षाची गौड ( शशांक ) वध संबंधाची प्रतिज्ञा. हर्षाने गौडराजावर स्वारी करून त्याचा समूल उच्छेद करण्याकरितां व पृथ्वीतील राजे जिंकण्याकरितां मोठ्या आवेशानं प्रतिज्ञा केली ती शेवटास गेल्याबद्दल बाण व हुएनसँग यांपैकी कोणींच विशेष रीतीनें वर्णन कले नाहीं. हुएनसँग यानें हर्षाने आपले शत्रु जिंकून त्यांस आपल्या ताब्यात आणले व त्याची पराक्रमाची कृत्यें ३०-३५ वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत चालली होती; अर्से सामान्यरीतीनें झटलें आहे. १ जनरल कनिंगह्याम याच्या ' एनशंट: जाग्रफी आफ इंडिया' यावरून व हुएन सँगच्या लेखावरूनहि हा काळ ठरतो.