पान:बाणभट्ट.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९७ ) वयी पाहून मालव व गौड यांनां त्यांचा सूड उगविण्यास संधि सापडली ! यांतील श्लेष तरी किती खुबीदार आहे ! 6 प्रभाकरवर्धनानें राज्यवर्धन व हर्ष यांच्या सहवासास मालवराज- पुत्र कुमारगुप्त व माधवगुप्त या दोघांस ठेवलें होतें व त्यांच्या सद्गुणांची त्यानें त्यांजवळ फारच प्रशंसा केली होती. तसेंच हस्तिसैन्याचा अधिपति स्कंदगुप्त यानें राज्यवर्धनाच्या उदाहरणावरून आपल्या देशाचाराप्रमाणे सर्वत्र विश्वास ठेवणें ठीक नाही, असे ह्मणून हर्षानें सावध रहावें ह्मणून इतिहा- सांतील अनेक उदाहरणे सांगून त्यास मोठ्या कळकळीने उपदेश केला आहे आणि मग तो हस्तिसैन्य सज्ज करण्यास व हर्षाबरोबर युद्धास जाण्याची तयारी करण्यास निघून गेला आहे. हर्ष हा विध्यारण्यांत दिवाकरमित्राकडे गेला, त्यावेळी मांधवगुप्ताच्या खांद्यावर हात टाकून गेला आहे ! यावरून मालवराजांत ( गुप्तराजांत ) दोन पक्ष होते. एक पक्ष हर्षास अनुकूल होता व दुसरा प्रतिकूल होता असे उघड दिसतें. 6 गुप्तराजे हे बाणकवीच्या पूर्वजांचा मोठा सन्मान ठेवीत होते असे अनेकगुप्तार्चितपादपंकज : ' या विशेषणावरून उघड दिसतें. बाणकवीनें १यतः सर्वैर्दोषाभिषंगैरसंगतौ बहुधोपधाभिः परीक्षितौ शुची विनीतौ विक्रान्तावभि- रूपौ मालवराजपुत्रौ भ्रातरौ भुजाविव मे शरीरादव्यक्तौ कुमारगुप्त माधवगुप्तावस्माभि- र्भवतोरनुचरत्वार्थमिमौ निर्दिष्टौ । अनयोरुपरि भवद्भयामपि नान्यपरिजनसमवृत्तिभ्यां भवितव्यम् । २ तदियमात्मदेशाचारोचिता स्वभावसरलहृदयजा न्यज्यतां सर्वविश्वासिता । ३ततो नरपतरभववन्मनस्यदूरवर्तिना खलु भवितव्यं भदन्तेनेति । अवतीर्यच गिरि- समुपस्पृश्य युगपद्विश्रामसमयसमुन्मुक्तहेपा घोषबंधिरीकृताटवीगहनामस्मिन्नेव स्थापयित्वा वाजिसेनामवलंब्यच तपस्विजनदर्शनोचितं विनयं हृदयेन दक्षि णेनच हस्तेन माधवगुप्तमंसे विरलैरेव राजभिरनुगम्यमानश्चरणाभ्यामेव प्रावर्त्तत गन्तुम् सरिति प्रदेशे ६०च०पा०२६४. गया जिल्हयांत अफसड ऊर्फ जाफरपूर येथे शिलालेख सापडला आहे त्यावरून माधवगुप्त यासहि हपने मांडलिक राजा केले असल्याचे कळते. यांत हर्षाच्या नांवाचा उल्लेख आहे. पान५-६ यांत छापलेल्या ताम्रपत्रांत हपीचा हस्ति सेनापति स्कन्दगुप्त यास महासामंत झटले आहे. यावरून हर्षराजाने आपल्या आश्रयानें असलेल्या गुप्तांस मांडलिक राजे केले होते असे लक्षांत येतें. १३