पान:बाणभट्ट.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८८ ) अर्थाचींच विशेषणें योजून ते वेदशास्त्रसंपन्न महाविद्वान् व महाकवि होते असें ह्मटलें आहे. वाणाचे पूर्वज व वाण हे शिवोपासक होते. बाण हर्षराजाकडे जाव- यास निघाला तेव्हां श्रीशंकराचें पूजन करून, होमहवन करून व ब्राह्मणांना दानधर्म करून निघाला आहे. दुर्जनाच्या सांगण्यावरून कलुषित झालेल्या अंतःकरणामुळे हर्षराजा बाणास कांहीं टोचून बोलला असतां, ते त्यास सहन न होऊन राजाची भीड न धरतां त्याचा मिथ्या ग्रह दूर करण्यास व आपली खरी योग्यता कळून येण्यास वाणाला आपला वंशे व आपले थोर व सदाचारी विद्वान् पूर्वज यांची व आपली स्वतःची यथार्थ महती वर्णन करणे भाग पडलें. बाणानें सांगवेदाध्ययन व अनेक शास्त्राध्ययन केले असल्याचें हर्ष- राजास पूर्वी स्पष्ट सांगितलेच आहे. पूर्वकाली अगोदर सांगवेदाध्ययन करून नंतर शास्त्राध्ययन करण्याचा परिपाठ होता तो बाणकालींहि विद्यमान होता, असे यावरून उघड होतें. बाणाच्या येथें वेदत्रयीचें व अनेक शास्त्रांचें अध्ययन व अध्यापन चालू असल्याबद्दल त्याच्या ग्रंथांत उल्लेख आढळतो. धर्मशास्त्रांत सांगवेदाध्ययनाचे मोठे फल सांगितले आहे. महाभारतभावितात्मानः, विदितसकलेतिहासाः, महाविद्वांसः, महाकवयः, महापुरुष- वृत्तान्तकुतूहलिनः, सुभाषितश्रवणरसस्सायनाः, वितृष्णाः, वयसि वचसि यशसि त पसि सदसि महसि वपुषि यजुपि च प्रथमाः, पूर्वमेव कृतसंगराः, वित्रक्षवः, स्मित- सुधाधवलितकपोलोदरा:, परस्परस्य मुखानि व्यलोकयन् । १ या संबंधानें हर्षचरितांतील उतारा मार्गे दाणाच्या व हर्षाच्या भेटीच्या वेळीं दिलाच आहे. 66 छन्दः पादौतु वेदस्य हस्तौ कल्पोऽथ पठ्यते । ज्योतिषामयनं चक्षुर्निरुक्तं श्रोत्रमुच्यते || शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम् । तस्मात्सांगमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते " इति ॥ दुर्गाचार्यकृत निरुक्तभाप्याच्या भूमिकेतहि वेद व वेदांगें यांचे प्रयोजन सांगितलें आहे ते अर्से :- 6 अथ किमर्थं वेदो वेदांगानि च प्रवृत्तानि ? सर्वकामप्राप्त्यादिर्मोक्षान्तः पुरुषार्थी वक्तव्य इति प्रवृत्तः । तत्परिज्ञानाय वेदाङ्गानि प्रवृत्तानि । ,