पान:बाणभट्ट.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८४ ) 6 गोष्ट टीकाकारानें ' श्रीहर्षाख्यस्य राज्ञो नाम्ना रत्नावलीं नाटिकां कृत्वा धावकाख्य कविहुधनं लेभे' याप्रमाणे रत्नावली नाटिकेचा नामनिर्देश अनुमानानें व पुढें तसाच इतरांनी अंधपरंपरा न्यायाने केला आहे असें वाटतें ! यास याखेरीज दुसरे कांहीं प्रमाण असते तर ते आजपर्यंत आढळल्या. खेरीज राहिले नसतें. बाणकवीस श्रीहर्षाचा जसा आश्रय मिळाला तसा टीक कारांच्या तर्कासहि त्याच्या पदरी असलेल्या धावककवीचा आधार सापडला इतकेंच ! याखेरीज दुसरा सबळ पुरावा असेल असे वाटत नाहीं. काश्मीराकडच्या काव्यप्रकाशाच्या प्रतीत 'श्रीहर्षादेर्वाणादीनामिव धनम्' असाच स्पष्ट पाठ आहे. दुसरे शितिकंठाच्या काव्यप्रकाशनिदर्शनांतहि 'श्रीहर्षादेर्वाणादीनामिव धनम्' असेच आहे ज्या प्रदेशांत काव्यप्रकाशा- चा मूळकर्ता मम्मट हा उत्पन्न झाला तिकडच्या प्रतीत धावक नसून बाण' असल्यामुळे आमच्या ह्मणण्यास चांगली बळकटी येते ही ध्यानांत घेण्यासारखी आहे. दोन्ही ग्रंथांत घावकाच्या जागी बाणाचा निर्देश केलेला आढळतो त्या अर्थी धावके हें वाणाचेंच दुसरे नांव कांहीं कारणानें पडलें असावें असें वाटतें. कारण, धावक या नांवाचा दुसराच कोणी कवि असावा व तो श्रीहर्षाच्या पदरीं असावा; अशी कल्पना चालवावी तर त्याच्या नांवावर एखादे काव्य किंवा अगदी थोडी तरी पद्ये असल्याबद्दल कोठें तरी कोणीं उल्लेख केला असता! परंतु तो कोठेंहि कोणी केलेला आढळत नाहीं. त्याअर्थी धावक हा निराळा कवि कल्पून अशा अप्रसिद्ध कवीची व हर्षाची बहुधन देण्याच्या कामांत सांगड घालून देणें अगदींच अप्रशस्त, अयुक्तिक व विसंगत दिसतें ! श्रीहर्पाने बाण हा थोर विद्वान् कवि ह्मणून त्यास आपले पदरीं बाळगले होते, त्या अर्थी त्याने त्यास कदाचित् ग्रंथ करण्यासहि साहाय्य केले असेल, नसेलच असे आमचें झणणे नाहीं! तथापि विद्वत्ता, चातुर्य इत्यादि सद्गुण त्याच्यांत होते यासाठी त्याने त्यालाच पुष्कळ द्रव्य दिले असेल, असें ह्मणणंच सयुक्तिक व योग्य दिसतें. मम्मटभट्टानें काव्यप्रकाशांत ग्रंथाचा मुळीच निर्देश केलेला नाहीं. तेव्हां त्यावरच्या 6 १ बाणाची ग्रंथरचनेत विशेष गति असल्यामुळे त्याचें हें यौगिक नांव धावु- गतिशुद्धयोः ' ह्या धातूपासून कदाचित् पडले असावे असे वाटते, किंवा वाणीतील दोष धुऊन टाकणारा तो असल्यामुळे त्यास घावक ही अन्वर्थक संज्ञा प्राप्त झाली असावी.